आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा
हरमनप्रीतकडेच नेतृत्वाची धुरा : कृष्ण बहादुर पाठक नवा गोलरक्षक : 8 ते 17 सप्टेंबरदरम्यान होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हॉकी इंडियाने 8 ते 17 सप्टेंबरदरम्यान चीनमधील हुलुनबुर, इनर मंगोलिया येथे होणाऱ्या प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 18 सदस्यीय भारतीय पुऊष हॉकी संघाची निवड जाहीर केली आहे. या स्पर्धेत आशियातील अव्वल हॉकी खेळणारे देश भारत, कोरिया, मलेशिया, पाकिस्तान, जपान आणि यजमान चीन यांच्यात लढत होणार आहे. गतविजेत्या भारताचे नेतृत्व ड्रॅग फ्लिकर तज्ञ हरमनप्रीत सिंग करेल आणि त्याला अनुभवी मिडफिल्डर विवेक सागर प्रसाद उपकर्णधार म्हणून साहाय्य करेल.
नव्या आव्हानासाठी सज्ज
अनुभव आणि तऊण खेळाडू यांचे चांगले मिश्रण सुनिश्चित करत संघ रचना काळजीपूर्वक ठरवली गेली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या संघातील दहा खेळाडू या संघाचा भाग आहेत, तर हार्दिक सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, समशेर सिंग आणि गुरजंत सिंग या पाच खेळाडूंना या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. आमचे रँकिंग पॉईंट्स वाढविण्याच्या दृष्टीने ही आमच्यासाठी एक महत्त्वाची मोहीम आहे. पॅरिस
ऑलिम्पिकमधील आमच्या कामगिरीनंतर आणि ते यश साजरे केल्यानंतर संघ नुकताच शिबिरात परतला आहे. संघावर जी प्रेम आणि प्रशंसेची बरसात झाली ती पाहता मागील काही आठवडे खरोखरच अविश्वसनीय राहिले. आम्हाला आशा आहे की, हा पाठिंबा आमच्या भविष्यातील मोहिमांमध्येही कायम राहील, असे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी म्हटले आहे. भारतीय संघ 8 सप्टेंबरला चीनविऊद्ध, त्यानंतर 9 सप्टेंबरला जपानविऊद्ध, एका दिवसाच्या विश्रांतीनंतर ते 11 सप्टेंबरला मलेशियाशी आणि 12 सप्टेंबरला कोरियाशी झुंजतील. 14 सप्टेंबरला भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होईल, तर सेमीफायनल आणि फायनल अनुक्रमे 16 आणि 17 सप्टेंबरला होतील.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय हॉकी संघ
- गोलकीपर: कृष्ण बहादूर पाठक, सूरज करकेरा.
- डिफेंडर: जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जुगराज सिंग, संजय, सुमित.
- मिडफिल्डर: राज कुमार पाल, नीलकंठ शर्मा, , मनप्रीत सिंग, मोहम्मद राहिल मौसीन.
- फॉरवर्ड: अभिषेक, सुखजित सिंग, अरिजित सिंग हुंडल, उत्तम सिंग, गुरज्योत सिंग.