भारतीय हॉकीने दिग्गजांसह साजरी केली गौरवशाली 100 वर्षे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील मेजर ध्यान चंद राष्ट्रीय स्टेडियम शुक्रवारी दुमदुमून जाऊन भारतीय हॉकीने आपली गौरवाशाली 100 वर्षे या खेळातील दिग्गजांसह साजरी केली. यात ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते गुरबक्ष सिंग आणि अस्लम शेर खान यांचा समावेश होता.
हॉकी इंडियाने खेळातील काही सर्वांत प्रसिद्ध खेळाडूंना त्यांच्या कायमस्वरूपी योगदानाबद्दल आणि खेळाडूंच्या पिढ्यांना त्यांनी दिलेल्या प्रेरणांबद्दल सन्मानित केले. समारंभात सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये गुरबक्ष, अस्लम, हरबिंदर सिंग, अजितपाल सिंग, अशोक कुमार, बी. पी. गोविंदा, जफर इक्बाल, ब्रिगेडियर हरचरण सिंग, विनीत कुमार, मीर रंजन नेगी, रोमियो जेम्स, असुंता लाक्रा आणि सुभद्रा प्रधान यांचा समावेश होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री थिऊ उदयनिधी स्टॅलिन यांच्यासमवेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी या खेळाच्या गौरवशाली प्रवासाचे आणि भारताच्या क्रीडा अभिमानाशी असलेल्या त्याच्या संबंधाचे कौतुक केले.
‘या खेळाने अनेक टप्पे पाहिले आहेत आणि ऑलिंपिकमध्ये हॉकीच्या माध्यमातूनच आपण जगाला भारत खेळात काय साध्य करू शकतो हे दाखवून दिलेले आहे. त्यानंतर आपण कधीही मागे वळून पाहिले नाही’, असे मांडविया म्हणाले. ‘समृद्ध इतिहास असलेली भारतीय हॉकी पुन्हा एकदा उदयास येत आहे आणि आणखी एका ऑलिंपिक पदकाकडे वाटचाल करत आहे’, असे त्यांनी सांगितले.
शताब्दी सोहळ्याची सुऊवात मांडविया यांच्या नेतृत्वाखालील क्रीडामंत्री इलेव्हन आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या नेतृत्वाखालील हॉकी इंडिया इलेव्हन यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याने झाली. सदर मैत्रिपूर्ण, पण स्पर्धात्मक सामन्याने दिवसाच्या सोहळ्याची दिशा निश्चित केली. क्रीडामंत्री इलेव्हनने ब्युटी डुंगडुंग, सलीमा टेटे आणि कृष्णा पाठक यांच्या गोलांच्या जोरावर 3-1 असा विजय मिळवला, तर मनप्रीत सिंगने हॉकी इंडिया इलेव्हनसाठी एकमेव गोल केला. या सामन्यात पुऊष आणि महिला या दोन्ही राष्ट्रीय हॉकी संघांतील खेळाडूंचा समावेश होता.
‘भारतीय हॉकीची 100 वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात भर घालणारे ठरले. त्यात या खेळातील विजय, आव्हाने आणि पुनऊज्जीवन या प्रवासाचे वर्णन केले आहे. याशिवाय एका विशेष छायाचित्र प्रदर्शनात दुर्मिळ संग्रहित छायाचित्रे, ऑलिंपिक आठवणी जागविणारी छायाचित्रे आणि 1928 च्या अॅमस्टरडॅम ऑलिंपिकमधील सुवर्णपदक मिळविणाऱ्या पदार्पणापासून ते आधुनिक युगातील पुनऊज्जीवनापर्यंत भारतीय हॉकीच्या उक्रांतीचा मागोवा घेणारी स्मृतिचिन्हे मांडणारी आली होती. तिर्की म्हणाले की, ज्या ठिकाणी त्यांचा स्वत:चा हॉकी प्रवास सुरू झाला होता त्या ठिकाणी परतणे खूप भावनिक होते.