कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यू-19 सॅफ चॅम्पियनशिपसाठी भारतीय फुटबॉल संघ जाहीर

06:22 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इटानगर

Advertisement

मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडीस यांनी सॅफ यू-19 फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी 23 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला असून 9 ते 18 मे या कालावधीत ही स्पर्धा अरुणाचल प्रदेश येथे होणार आहे.

Advertisement

25 संभाव्य खेळाडूंचा संघ इटानगर येथे 30 एप्रिल रोजी दाखल झाला आणि या खंडीय स्पर्धेआधी ट्रेनिंग घेत होता. त्याआधी बेंगळूरमध्ये पहिले सराव शिबिर झाले होते. फर्नांडीस म्हणाले की, ‘आम्ही महिन्याआधीपासून बेंगळूरमध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली, त्यावेळी 50 खेळाडूंचा समावेश होता. या मुलांमध्ये असलेले टॅलेंट पाहून मला आश्चर्य वाटले नाही. या खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आखलेली दर्जेदार योजना पाहून मला खूप आनंद झाला. आता संघबांधणीच्या दीर्घ प्रक्रियेला सुरुवात झाली आहे,’ असे ते म्हणाले. 48 वर्षीय यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने सॅफ ज्युनियर चॅम्पियनशिप तीन वेळा जिंकली आहे. वातावरणाशी जुळवून घेण्याचा कालावधी महत्त्वाचा असतो, यावर त्यांनी जोर दिला.

या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश असून याच गटात नेपाळ व लंका यांचाही समावेश आहे. भारताचा पहिला सामना 9 मे रोजी नेपाळविरुद्ध होईल. गोल्डन ज्युबिली स्टेडियमवर हे सामने खेळविले जातील. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय फुटबॉल संघ : गोलरक्षक-आरुष हरी, अहीबम सुरज सिंग, रोहित. बचावफळी-आशिक अधिकारी, टी.बंगसन सिंग, जॉड्रिक अब्रांचेस, मलेम्नगम्बा सिंग थॉकचोम, मोहम्मद कैफ, सुमित शर्मा बी., सोहम उतरेजा, रोशन सिंग थांगजम. मध्यफळी-डॅनी मीतेइ लैशराम, गुरनाज सिंग ग्रेवाल, मोहम्मद अरबाश, एन.रिशी सिंग, सिंगामयुम शमी. आघाडी फळी-अहोंगशांगबम सॅमसन, भारत लैरेन्जाम, छापामयुम रोहेन सिंग, ओमांग दोडम, प्रशान जाजो, हेमनीचुंग लंकिम, योहान बेंजामिन. मुख्य प्रशिक्षक-बिबियानो फर्नांडीस, गोलरक्षक प्रशिक्षक-दीपान्कर चौधरी.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article