महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय फुटबॉल संघ जाहीर

06:24 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरीच्या कतार विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने शनिवारी 23 सदस्यांचा संघ जाहीर केला. भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक स्टिमॅक यांनी या सामन्यासाठी बोस रानवडे आणि लालचुंगनुंगा यांना वगळले आहे.

Advertisement

कर्णधार सुनील छेत्री फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना आहे. गेल्या बुधवारी येथील सॉल्टलेक स्टेडियमवर कुवतेविरुद्धचा सामना भारताने गोल शून्य बरोबरीत राखला होता. या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताने अ गटातून पाच गुणासह दुसरे स्थान मिळवले आहे. या गटात कतार 13 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. अफगाण आणि कुवेत यांनी अनुक्रमे 5 आणि 3 गुण घेत तिसरे आणि चौथे स्थान मिळवले आहे. दरम्यान या गटातून कतारने तिसऱ्या फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. आता कतारबरोबरचा आगामी सामना भारताला जिंकणे जरुरीचे आहे. भारतीय फुटबॉल संघ शनिवारी कोलकाता येथून डोहाकडे रवाना झाला. भारत आणि कुवेत हा सामना मंगळवारी डोहामध्ये खेळविला जाणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article