For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय फुटबॉल संघ जाहीर

06:22 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय फुटबॉल संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

Advertisement

पुढील महिन्यात होणाऱ्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल पात्र फेरीच्या कुवेतविरुद्धच्या लढतीसाठी शुक्रवारी प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 27 सदस्यांचा भारतीय फुटबॉल संघ घोषित केला. या संघात आघाडी फळीतील पी. गोगोई आणि बचावफळीतील मोहमद हमाद यांना दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे.

या सामन्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भुवनेश्वरमध्ये सराव शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये एकूण 32 फुटबॉलपटूंचा समावेश होता. या शिबिरातील 27 जणांची भारतीय संघात निवड करण्याचा निर्णय स्टिमॅक यांनी घेतला आहे. 29 मे पर्यंत सध्या निवडण्यात आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी भुवनेश्वरमध्ये सरावाचे शिबिर घेण्यात येईल. त्यानंतर हा संघ कोलकाताला रवाना होईल. भारत आणि कुवेत यांच्यातील हा महत्त्वाचा सामना 6 जून रोजी कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ कतारला 11 जून रोजी रवाना होईल. कतारमध्ये पात्र फेरीतील अ गटातील शेवटचे दोन सामने होणार आहेत. अ गटात भारत सध्या दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी चार सामन्यातून चार गुण मिळविले आहेत.

Advertisement

भारतीय फुटबॉल संघ : गोल रक्षक-गुरुप्रित सिंग संधू, अमरिंदर सिंग, विशाल कैथ, बचावफळी- अॅमे रेनवाडे, अन्वर अली, जयगुप्ता, लालचुंगनुंग, मेहताप सिंग, नरेंद्र, निकील पुजारी, राहुल भेके, सुभाशिष बोस, मध्यफळी-अनिरुद्ध थापा, बी. फर्नांडिस, एल. एडमंड, जक्सन सिंग टी., एल. चेंगटे, कोलॅको, महेश सिंग नेरोम, नंदकुमार शेखर, साहिल अब्दुल समाद, सुरेश सिंग वेंगजाम, आघाडीफळी- एल. डेविड, मनवीर सिंग, रहीम अली, सुनील छेत्री, विक्रम प्रताप सिंग.

Advertisement
Tags :

.