For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेकरता भारतीय श्वान तैनात

06:03 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेकरता भारतीय श्वान तैनात
Advertisement

सीआरपीएफच्या दोन के9 टीम्सची निवड

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेत यंदा सीआरपीएफच्या एलीट डॉग स्क्वॉड के-9 तैनात असणार आहे. के9 टीम्स पॅरिसमध्ये पोहोचल्या आहेत. या टीम्सना 26 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत आगामी पॅरिस ऑलिम्पिक, 2024 च्या विविध ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यासाठी निवडण्यात आले आहे. प्रशिक्षित श्वान यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या श्वानपथकात बेल्जियम शेफर्ड मॅलिनोइस प्रजातीच्या दोन श्वानांचा समावेश आहे.

Advertisement

सीआरपीएफच्या डॉग ब्रीडिंग अँड ट्रेनिंग स्कूलमध्ये आयोजित कठोर परीक्षेनंतर या श्वानांची निवड करण्यात येते. दोन्ही के9 च्या संचालकांना देखील कठोर परीक्षेला सामोरे जावे लागले असल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले. सीआरपीएफच्या या श्वानपथकाला पॅरिसमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जाणार आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनादरम्यान फ्रान्सच्या सरकारला सुरक्षेकरता भारताकडून मदत करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.