For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत भारतीय जोडप्याला 11 वर्षांची शिक्षा

06:44 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत भारतीय जोडप्याला 11 वर्षांची शिक्षा
Advertisement

नातेवाईकाचे शोषण केल्याप्रकरणी दोषी

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या जोडप्याने स्वत:च्या एका नातेवाईकाला शाळेत शिकविण्याचे प्रलोभन दाखवत अमेरिकेत आणून त्याला 3 वर्षांपर्यंत बळजबरीने पेट्रोलप पंप आणि जनरल स्टोअरवर काम करण्यास भाग पाडले होते. अमेरिकेच्या न्यायालयाने या जोडप्याला आता 135 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे.

Advertisement

31 वर्षीय भारतीय अमेरिकन नागरिक हरमनप्रीत सिंह आणि त्याची 43 वर्षीय पत्नी कुलबीर कौर यांना पीडित व्यक्तीला 1.87 कोटी रुपयांची भरपाई देखील द्यावी लागणार आहे. हरमनप्रीत आणि कुलबीर यांचा आता घटस्फोट झाल आहे.

हरमनप्रीत आणि कुलबीरने खोटे आश्वासन देत एका नातलगाला अमेरिकेत आणले हेते. यानंतर त्याचा पासपोर्ट आणि इमिग्रेशन दस्तऐवज स्वत:कडे राखले होते. या नातेवाईकाचा छळ करत त्याला कित्येक तासांपर्यंत स्वत:च्या स्टोअरवर काम करायला दोघेही भाग पाडत होते. तर काम सोडण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकाला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. पीडिताकडून मार्च 2018 पासून मे 2021 पर्यंत बळजबरीने काम करविण्यात आले होते. त्याच्याकडून साफसफाई, स्वयंपाक, दुकानावर सामग्री जमा करणे, कॅश रजिस्टर सांभाळो अशी कामे करविली जात होती. पीडित सलग 12-17 तासांपर्यत काम करायचा, याच्या बदल्यात त्याला पुरेसे अन्नही दिले जात नव्हते. तसेच वैद्यकीय आणि शिक्षणाच्या सुविधेपासून त्याला दूर ठेवण्यात आले हेते. याचबरोबर त्याला भारतात परतण्याची अनुमती दिली जात नव्हती.

Advertisement
Tags :

.