इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनिर्णित लढतीत भारतीय फलंदाजांची चमक
वृत्तसंस्था/ कँटरबरी ड्यूक
कँटरबरी येथे झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यातील इंग्लंड लायन्सविऊद्धच्या दुसऱ्या डावात नितीश रे•ाr आणि ध्रुव जुरेल यांनी भारत ‘अ’चे आव्हान कायम ठेवले. हा सामना अखेर अनिर्णित राहिला. नितीश रे•ाr (52 धावा) आणि ध्रुव जुरेल (53 धावा) हे नाबाद राहून भारत ‘अ’ संघाने चौथ्या दिवसाच्या अखेरीस 2 बाद 241 पर्यंत मजल मारली.
भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल 64 धावांवर बाद झाला, तर अभिमन्यू ईश्वरनने 68 धावा काढल्या. या जोडीने पहिल्या यष्टीसाठी 123 धावा जोडल्या. उपाहारानंतर भारत ‘अ’ने आपला दुसरा डाव सुरू केला. जैस्वाल आणि ईश्वरन यांनी डावाची सुऊवात केली. जैस्वालने जोश हलच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून भारताचा दुसरा डाव सुरू केला. भारताने सहाव्या षटकापर्यंतच 50 धावांची भर घातली होती. कारण दोन्ही फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केले.
ईश्वरनने 15 व्या षटकात अजित डेलच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरच्या षटकात जैस्वालने एडी जॅकच्या गोलंदाजीवर चौकार हाणून आपले अर्धशतक पूर्ण केले. 20 व्या षटकात रेहान अहमदने जैस्वालला बाद केल्यानंतर ध्रुव जुरेलने ईश्वरनला साथ दिली. 28 व्या षटकात अहमदने ईश्वरनला बाद केल्यानंतर नितीश रे•ाrला फलंदाजी क्रमात बढती देण्यात येऊन त्याची ध्रुव जुरेलसह जोडी जमली.
यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रे•ाr यांनी 6 जूनपासून नॉर्थम्प्टन येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी चांगली खेळी करून लय आणि आत्मविश्वास मिळवला आहे. शेवटच्या दिवशी 25 षटके शिल्लक असताना भारत ‘अ’ संघाने 41 षटकांत 2 बाद 241 धावांपर्यंत मजल मारली. त्यापूर्वी इंग्लंड लायन्सचा पहिला डाव चौथ्या दिवशी उपाहारापूर्वी 587 धावांवर संपला आणि भारत ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील 557 धावांचा विचार करता त्यांनी 30 धावांची आघाडी घेतली.