महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑलिम्पिकसाठी भारतीय तिरंदाजी संघ जाहीर

06:14 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेने सोमवारी भारतीय तिरंदाजी संघाची घोषणा केली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष आणि महिला तिरंदाजी संघांनी कोटा पद्धतीनुसार विश्व तिरंदाजी मानांकनाच्या आधारावर आपली पात्रता सिद्ध केली आहे.

Advertisement

पुरुष आणि महिलांच्या सांघिक विभागात अपात्र ठरणाऱ्या देशांच्या मानांकन यादीत भारताने आघाडीचे स्थान मिळविल्याने त्यांचे पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित झाले. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्व म्हणजे 5 पदकांसाठीच्या तिरंदाजी प्रकारात भारताचे तिरंदाजपटू सहभागी होणार आहेत. पुरुष आणि महिला सांघिक, वैयक्तिक आणि मिश्र विभागामध्ये भारताचे तिरंदाजपटू सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या विभागात भारत आणि चीन तर महिलांच्या विभागात इंडोनेशियाला सांघिक कोटा पद्धतीनुसार ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले. गेल्या वर्षी बर्लिनमध्ये पहिली ऑलिम्पिक पात्रता तिरंदाजी स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेतून दक्षिण कोरिया, तुर्की आणि जपान यांनी पुरुष विभागात आपली पात्रता सिद्ध केली तर महिलांच्या विभागात जर्मनी आणि मेक्सिको यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपले स्थान आरक्षित केले. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत आशियाई टप्प्यातून कझाकस्तान आणि दक्षिण कोरिया यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या सांघिक कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. त्यानंतर पॅन अमेरिका टप्प्यामध्ये कोलंबिया आणि अमेरिका हे देश पात्र ठरले. युरोपियन टप्प्यातून पुरुष विभागात इटली तर महिलांच्या विभागात नेदलँड्सने कोटा पद्धतीनुसार पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले आहे. गेल्या आठवड्यात अँटेलिया येथे झालेल्या अंतिम ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या टप्प्यामध्ये पुरुष विभागात मेक्सिको, चीन तैपेई आणि ब्रिटन तर महिलांच्या विभागात चीन, मलेशिया ब्रिटन आणि चीन तैपेई यांनी ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

भारतीय तिरंदाज संघ - पुरुष : तरुणदीप राय, धीरज बोमादेवरा, प्रवीण जाधव. महिला : दीपिकाकुमारी, भजन कौर आणि अंकिता भक्त.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article