महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय तिरंदाजपटू अंतिम फेरीत

06:12 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ येचॉन (द. कोरिया)

Advertisement

येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज-2 तिरंदाजी स्पर्धेत भारताचे तिरंदाजपटू ज्योती सुरेखा व्हेनाम आणि प्रियांश यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात अंतिम फेरीत गाठल्याने या स्पर्धेत भारताचे दुसरे पदक निश्चित झाले आहे. त्याचप्रमाणे दीपिका कुमारीने रिकर्व्ह प्रकारात उपांत्य फेरी गाठली आहे.

Advertisement

भारताच्या महिला कंपाऊंड संघामध्ये ज्योती व्हेनाम, परनित कौर आणि आदिती स्वामी यांचा समावेश आहे. भारताच्या या महिला कंपाऊंड संघाने यापूर्वी अंतिम फेरी गाठून आपल्या देशाचे पहिले पदक निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे भारताचा युवा तिरंदाजपटू प्रथमेश फुगेने वैयक्तिक विभागात उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या मिश्र सांघिक कंपाऊंड संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान द. कोरियाचा 158-157 अशा केवळ एका गुणाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताची माजी टॉप सिडेड महिला तिरंदाजपटू दीपिका कुमारीने वैयक्तिक गटात उपांत्य फेरी गाठली. आता तिचा उपांत्य फेरीचा सामना द्वितीय मानांकित द. कोरियाच्या लिम सिहोनशी होणार आहे. दीपिका कुमारीने पहिल्या फेरीतील लढतीत स्लोव्हेनियाच्या कार्डीनेरचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारातील अन्य सामन्यात भारताच्या भजन कौरला तसेच अंकिता भक्तला पहिल्याच्या फेरीत हार पत्करावी लागली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article