युद्धाभ्यासात भारतीय वायुदल सहभागी
सिंगापूर-जर्मन हवाई दलासह संयुक्त सराव
वृत्तसंस्था/ अलास्का
भारतीय हवाई दलाने अमेरिकेतील अलास्का येथे आयोजित रेड फ्लॅग 2024 या सरावात भाग घेतला. हा सराव 4 जून ते 14 जून या कालावधीत अलास्का येथील इलसन हवाई दलाच्या तळावर झाला. अमेरिका आणि भारताशिवाय सिंगापूर, ब्रिटन, नेदरलँड आणि जर्मनीच्या हवाई दलानेही संयुक्तपणे सराव केला.
भारतातून 29 मे रोजी हवाई दलाची तुकडी अलास्कासाठी रवाना झाली होती. या टीममध्ये राफेल फायटर जेट आणि एअर क्रू तसेच तंत्रज्ञ, अभियंते, नियंत्रक आणि लढाऊ जेट तज्ञांचा समावेश होता. राफेल आणि टीम सदस्यांना अलास्का येथे नेण्यासाठी सी-17 ग्लोबमास्टर विमानाचा वापर करण्यात आला.
रेड फ्लॅग मॅन्युव्हर हा एक प्रगत लढाऊ प्रशिक्षण सराव आहे. ‘रेड फ्लॅग 2024’चा युद्धाभ्यास सराव आयोजित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यादरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण करून सराव करण्यात आला. रेड फोर्स बचाव आणि ब्लू फोर्स आक्रमणासह, इच्छित वातावरणासाठी सैन्यांची सीमांकन करण्यात आली. या सरावातील रेड फोर्स प्रामुख्याने अमेरिकन एअर फोर्सच्या आक्रमक स्क्वॉड्रन्सने तयार केले होते. त्यात एफ-16 आणि एफ-15 सारखी आधुनिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती.