महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत महिला संघाची सलामी विंडीजविरुद्ध

06:16 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यू-19 महिला टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर, जानेवारी-फेब्रुवारीत होणार स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

महिलांच्या यू-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले असून विद्यमान विजेत्या भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध होणार आहे. पुढील वर्षी 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत महिलांची ही स्पर्धा मलेशियात होणार आहे.

भारतीय यू-19 महिला संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून याच गटात यजमान मलेशिया, वेस्ट इंडीज व लंका या संघांचाही समावेश आहे. गेल्या वर्षीय दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या आवृत्ती भारताने अंतिम फेरीत इंग्लंड महिला संघाचा पराभव करून जेतेपद पटकावले होते.  ब गटात इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका, क गटात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, नवोदित सामोआ यांचा तर पात्रता फेरीतून आलेले आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, स्कॉटलंड व आशियातील पात्र संघांचा ड गटात समावेश करण्यात आला आहे.

राऊंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या टप्प्यात प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाविरुद्ध लढत देईल. त्यामुळे प्रत्येक संघाला गटसाखळीत तीन सामने खेळावे लागतील. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील. 24 जानेवारी रोजी गट अ व ड आणि ब व क मध्ये तळाशी राहणाऱ्या संघांत अंतिम क्रमवारी ठरविण्यासाठी प्लेऑफ लढती खेळविल्या जातील.

सुपरसिक्स फेरीत दोन गट करण्यात आले असून पहिल्या गटात अ व ड गटातील अव्वल तीन संघ तर दुसऱ्या गटात ब व क गटातील अव्वल संघ असतील. सुपरसिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 31 जानेवारी रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत खेळतील आण्णि 2 फेब्रुवारी रोजी जेतेपदासाठी लढत होईल. बायूमास ओव्हल येथे दोन्ही उपांत्य सामने होतील. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेळेल. 31 जानेवारीस ही लढत होईल. दोन्ही उपांत्य व अंतिम लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 1 फेब्रुवारी हा उपांत्य लढतीसाठी तर 3 फेब्रुवारी हा अंतिम लढतीसाठी राखीव दिवस असेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article