कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेटलिफ्टींग स्पर्धेत भारताला दोन कांस्य

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / लिमा (पेरु)

Advertisement

आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या युवा आणि कनिष्टांच्या विश्व वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने दोन कांस्य पदके मिळवून आपल्या मोहीमेला प्रारंभ केला आहे. भारताच्या ज्योत्स्ना सबर आणि तसेच हर्षवर्धन साहू यांनी प्रत्येकी एक कांस्य पदक मिळविले. मुलींच्या 40 किलो वजन गटामध्ये भारताच्या ज्योत्स्ना सबरने स्नॅचमध्ये 56 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 72 किलो असे एकूण 129 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले. ज्योत्स्ना सबरने क्लिन आणि जर्कमध्ये रौप्यपदकही पटकाविले आहे.

Advertisement

मुलांच्या 49 किलो वजन गटात भारताच्या हर्षवर्धन साहूने स्नॅचमध्ये 87 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 110 किलो असे एकूण 197 किलो वजन उचलत तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक मिळविले. हर्षवर्धनने या स्पर्धेत क्लिन आणि जर्कमध्ये आणखी एक  कांस्यपदक मिळविले आहे. लिमामध्ये सुरू असलेल्या या विश्व युवा आणि कनिष्टांच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर स्पर्धकांना स्नॅच, क्लिन आणि जर्क त्याच प्रमाणे एकूण अशा तीन प्रकारात स्वतंत्र पदके दिली ज्हात आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article