विश्व युवा टेटे स्पर्धेत भारताला रौप्य व कांस्य पदक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी रोमानिया येथे झालेल्या आयटीटीएफ जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत दमदार पदार्पण केले. त्यांनी 19 वर्षांखालील मुलांच्या आणि 15 वर्षांखालील मुलींच्या संघात अनुक्रमे एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आणि जपानकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
अंकुर भट्टाचार्जीला र्युयूसेई कावाकामीकडून 17-15, 6-11, 12-10, 4-11, 11-13 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जपानने आपली आघाडी वाढवली. काझाकी योशियामाने अभिनंदला 11-7, 11-8, 11-6 असे हरवले आणि त्यानंतर तमितो वातानाबेने प्रियनुज भट्टाचार्यवर 11-9, 11-7, 11-3 असा सरळ गेममध्ये विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी, भारताने उपांत्य फेरीत चिनी तैपेईवर 3-2 असा रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
15 वर्षांखालील मुलींनी उपांत्य फेरीत पोहोचून कांस्यपदक मिळवून भारताच्या प्रभावी पदार्पणात भर घातली. दक्षिण कोरियाविरुद्ध 0-3 असा पराभव पत्करावा लागला तरी, अंकोलिका चक्रवर्ती, दिव्यंशी भौमिक आणि अनन्या मुरलीधरन यांनी आशादायक कामगिरी केली, विशेषत क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीवर संघाचा 3-1 असा उल्लेखनीय विजय झाल्यानंतर 19 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत, उत्साही कामगिरी असूनही भारताचा क्वार्टर फायनलमध्ये चिनी तैपेईकडून 2-3 असा पराभव झाला. सिंद्रेला दास, पृथा वर्टिकर आणि तनीशा कोटेचा यांच्या विजयामुळे भारताला संधी मिळाली, परंतु अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताची प्रगती थांबली.