महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताला अर्जेंटिनात लिथियम कंत्राट; चीनला जबर धक्का

06:40 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

, पाच विभागांमध्ये शोधकार्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

चीनला धोबीपछाड देताना भारताने अर्जेंटिनातील लिथियम शोधकार्य करण्याचे महत्वाचे कंत्राट मिळविले आहे. लिथियम अत्यंत मौल्यवान धातू असून तो इलेक्ट्रॉनिक साधने आणि बॅटऱ्यांमध्ये उपयोगात आणला जातो. अर्जेंटिनात या धातूच्या खाणी असून अशा खाणी असलेल्या पाच विभागांमध्ये या धातूचा शोध घेण्याचे कंत्राट भारताच्या कंपनीला मिळाले आहे. नुकताच हा करार झाला आहे.

भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘खनिज विदेश इंडिया लिमिटेट या केंद्र सरकारनियंत्रित कंपनीला हे कंत्राट मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक दिवस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. या कराराच्या माध्यमातून भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील उत्कट सहकार्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.

200 कोटी रुपयांचा करार

हा करार 200 कोटी रुपयांचा आहे. या करारामुळे भारताच्या खाण उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून मौल्यवान धातू क्षेत्रात जागतिक पातळीवर पदार्पण करण्याची संधी भारताला मिळणार आहे. ‘कोर्टाडेरा-1, कोर्टाडेरा-8, काटेओ-2022-01810132 आणि कोर्टाडेरा-6 या पाच क्षेत्रांमध्ये भारत हे शोधकार्य करणार आहे. या पाचही भागांचे एकंदर क्षेत्रफळ 15,703 हेक्टर आहे. हे विभाग अर्जेंटिनाच्या काटामार्का प्रांतात आहेत. भारत आता या प्रांतात आपली एक शाखा स्थापन करणार असून त्वरित कामाला प्रारंभ होईल.

भारताला कोणते अधिकार ?

कंत्राट दिलेल्या पाच विभागांमध्ये खाणकाम करणे, लिथियमचा शोध घेणे, लिथियम आढळून आल्यास त्याचे खनन करणे, लिथियमचे खनिज बाहेर काढणे, तसेच त्याचे व्यापारी उत्पादन करणे असे विशेष अधिकार भारताला या कराराच्या अंतर्गत मिळणार आहेत. या भागांमध्ये लिथियम मिळाल्यास भारताचीही लिथियमची आवश्यकता बऱ्याच प्रमाणात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

लिथियमचे बहुविध उपयोग

लिथियमचा उपयोग मुख्यत: अगदी लहान आकारापासून मोठ्या आकारापर्यंतच्या बॅटऱ्यांसाठी होतो. या धातूच्या बॅटऱ्या अत्यंत टिकावू असतात. त्यामुळे मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिक साधने, वीजवर चालणाऱ्या कार्स आणि इतर वाहने, इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर्स अशा अनेक वस्तूंसाठी हा अत्यावश्यक धातू आहे. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक आणि बॅटरी उद्योग या धातूवर अवलंबून आहे. त्यामुळे या धातूला प्रचंड मागणी असून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. भारतातही मध्यंतरी लिथियमचे मोठे साठे मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

लिथियम ‘त्रिकोण’

अर्जेंटिना, चीली आणि बोलिव्हिया या देशांमध्ये लिथियमचे मोठे साठे आहेत. जगातील लिथियमच्या एकंदर ज्ञात साठ्यांपैकी निम्म्याहून अधिक साठे या तीन देशांमध्ये आहेत. त्यामुळे हा भाग ‘लिथियम त्रिकोण’ म्हणून ओळखला जातो. येथील लिथियमचे व्यापारी तत्वावर उत्पादन झाल्यास या देशांसमवेत जगाचाही लाभ होणार आहे. विशेषत: वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी ते उपयुक्त ठरेल.

चीनला धक्का बसणे शक्य

या करारामुळे चीनला धक्का बसणे शक्य आहे. सध्या लिथियमचे सर्वाधिक उत्पादन चीन करत आहे. मात्र, त्या देशातील लिथियमचे साठे फारकाळ पुरणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे चीनही जगभरात या धातूच्या शोधकार्याची कंत्राटे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताच्या आधीपासून चीनचे या संदर्भात अर्जेंटिनावर लक्ष आहे. तथापि, आता अर्जेंटिनात सत्तापालट झाला असून नवे प्रशासनाने चीनला प्राधान्य न देण्याचे धोरण लागू करत आहे. याचा लाभ भारताला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली असून चीन या स्पर्धेत, या करारामुळे काहीसा मागे पडल्याचे दिसत आहे. हा चीनला धक्का आहे.

भारताला मोठी संधी

ड अर्जेंटिनाशी करार झाल्याने भारताला खाण क्षेत्रात मोठी संधी मिळणार

ड लिथियम हे इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि बॅटऱ्यांसाठी महत्वाचे मूलद्रव्य

ड अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चीली या देशांमध्ये लिथियमचे मोठे साठे

ड भारताला कंत्राट मिळाल्याने चीनचा अर्जेंटिनात शिरकाव रोखला जाणार

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article