आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला सुवर्ण, रौप्य पदक
वृत्तसंस्था/ दुबई
शुक्रवारी येथे झालेल्या युवा आशियाई पॅरा गेम्स 2025 मध्ये भारताच्या पॅरा-अॅथलीट्सनी प्रभावी कामगिरी केली. बेबी सहाना रवी आणि विश्वा विजय तांबे यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले.
सहाना रवीने पॅरा टेबल टेनिसच्या वर्ग एसएफ-9 23 वर्षाखालील गटात फिलीपिन्सच्या ल्हे मेरी मँगिन्सेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. विश्वा विजय तांबेने उत्तर कोरियाच्या क्वांग नाम सो विरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवित वर्ग एसएम-10 गटात भारताच्या पदक तालिकेत रौप्यपदकाची भर घातली. या स्पर्धेत धनुर्विद्या, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन बोसिया, गोलबॉल, पॉवरलिफ्टिंग, पोहणे, तायक्वांदो, टेबल टेनिस, व्हीलचेअर बास्केटबॉल आणि आर्मरेसलिंग या 11 क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहेत. भारताने 8 क्रीडा प्रकारांमध्ये 61 पुरुष आणि 38 महिलांचा समावेश असलेले 99 सदस्यीय पथक पाठवले आहे