भारताला नेमबाजीत सुवर्ण, कांस्य
06:00 AM Nov 19, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
टोकियो : येथे सुरू असलेल्या 25 व्या डेफ ऑलिम्पिक्स नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताच्या नेमबाजांनी सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदकांची कमाई केली. पुरूषांच्या 10 मि. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या धनुष्य श्रीकांत आणि महीत संधू यांनी द. कोरियाच्या जेऑन डेन व किम वूरीम यांचा 17-7 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. तर भारताच्या मोहम्मद मुर्तझा वानीया आणि कोमल वाघमारे यांनी वैयक्तिक गटात कांस्यपदक मिळविताना युक्रेनच्या लायकोव्हा आणि कोस्टीक यांचा पराभव केला. तीन दिवसांत भारतीय स्पर्धकांनी एकूण 9 पदकांची कमाई केली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article