पहिल्याच दिवशी भारताला चार पदके
वृत्तसंस्था / बिजींग (चीन)
2025 च्या विश्व पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण चार पदके पटकाविली. भारतीय पॉवरलिफ्टर्सनी या स्पर्धेच्या मोहीमेला दणकेबाज प्रारंभ केला. सदर स्पर्धा विश्वपॅरा पॉवरलिफ्टिंग यांच्या विद्यमाने सुरू झाली असून त्यामध्ये 40 देशांचे अव्वल स्पर्धक सहभागी झाले आहेत. 2026 च्या विश्वचॅम्पियनशिप तसेच 2028 च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चीनमधील ही स्पर्धा पात्रतेची आहे.
या स्पर्धेत गुलफेम अहमदने भारताचे पदक तक्त्यात खाते उघडताना पुरुषांच्या इलाईट 59 किलो गटात पहिल्याच प्रयत्नात 145 किलो तर दुसऱ्या प्रयत्नात 151 किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले. पुरुषांच्या इलाईट 72 किलो वजन गटात रामूभाई बांबव्हाने पहिल्याच प्रयत्नात 151 किलो वजन उचलत भारताला दुसरे कांस्यपदक मिळवून दिले. मास्टर्स विभागात जॉबी मॅथ्युने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने हे सुवर्णपदक एकूण वजन उचण्याच्या प्रकारात मिळविले. जॉबी मॅथ्युने पहिल्या प्रयत्नात 140 किलो तर दुसऱ्या प्रयत्नात 145 आणि तिसऱ्या प्रयत्नात 150 किलो वजन उचलले. जॉबी मॅथ्युने मास्टर्स विभागात सर्वोत्तम कामगिरी लिफ्टींग प्रकारात करत रौप्य पदकही घेतले.