For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कबड्डीत भारताला दुहेरी मुकुट

05:03 AM Oct 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
कबड्डीत भारताला दुहेरी मुकुट
Advertisement

वृत्तसंस्था/ मनामा, बहरिन

Advertisement

येथे सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावत क्लीन स्वीप साधले.

भारताच्या दोन्ही संघांची अंतिम लढत इराण संघांविरुद्धच होती. मुलांच्या अंतिम लढतीत भारतीय संघाला इराणकडून कडवा प्रतिकार झाला. भारताने ही लढत 35-32 अशी जिंकत सुवर्ण पटकावले. मुलींच्या विभागात भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व राखत 75-21 असा एकतर्फी विजय मिळवित जेतेपद पटकावले. मुलींच्या संघाने प्राथमिक फेरी अपराजित राहून संपवली होती. त्यांनी बांगलादेशला 46-18, थायलंडला 70-23, लंकेला 73-10, इराणला 59-26 अशा गुणांनी पराभूत केले होते. राऊंड रॉबिन फेरीनंतर गटातील अव्वल दोन संघांत जेतेपदाची लढत घेतली गेली.

Advertisement

भारताच्या मुलांचा संघही गटसाखळी फेरीत अपराजित राहिला. त्यांनी बांगलादेशला 83-19, लंकेला 89-16, पाकिस्तानला 81-26, इराणला 46-29, यजमान बहरिनला 84-40, थायलंडला 85-30 अशा गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

Advertisement
Tags :

.