For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्थव्यवस्थेत जगात तिसरा नंबर पटकावणार भारत

06:36 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्थव्यवस्थेत जगात तिसरा नंबर पटकावणार भारत
Advertisement

2030 पर्यंत हा टप्पा प्राप्त करणार : एस अॅण्ड पी रेटिंग्सचा अंदाज

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत 2030 पर्यंत तिसरी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. रेटिंग एजन्सी एस अॅण्ड पी या ग्लोबल रेटिंग्सने गुरुवारी एका अहवालात ही माहिती दिली. तथापि, एजन्सीने म्हटले आहे की, वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत सेवांची व्याप्ती वाढवण्यात वाढती आव्हाने आहेत आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी वाढत्या गुंतवणुकीच्या गरजांचाही सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

अहवालात असे म्हटले आहे की, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना पुढील दशकासाठी आणि त्यापुढील काळासाठी उच्च महत्त्वाकांक्षा आहेत. भारताची सध्याची 3,600 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 30,000 अब्ज डॉलरची बनण्याचे उद्दिष्ट आहे. भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

एस अॅण्ड पीने म्हटले आहे की, ‘भारत पुढील तीन वर्षांत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे आणि 2030 पर्यंत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. 2024 मध्ये गुंतवणूक बँकिंग फर्म जेपी मॉर्गनच्या ‘गर्व्हन्मेंट इमर्जिंग मार्केट्स बाँड इंडेक्स’मध्ये त्याचा प्रवेश अतिरिक्त प्रदान करू शकेल.

सरकारी वित्तपुरवठा व देशांतर्गत भांडवली बाजारातील संसाधनांमध्ये प्रवेश

एस अॅण्ड पीने आपल्या ‘फ्यूचर आउटलुक ऑन इमर्जिंग मार्केट्स: एक निर्णायक दशक’ अहवालात म्हटले आहे की, उदयोन्मुख बाजारपेठ पुढील दशकात जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. 2035 पर्यंत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) सरासरी वाढीचा दर 4.06 टक्के असेल, तर प्रगत अर्थव्यवस्थांचा दर 1.59 टक्के असेल. 2035 पर्यंत, उदयोन्मुख बाजारपेठा जागतिक आर्थिक विकासात सुमारे 65 टक्के योगदान देतील. ही वाढ प्रामुख्याने आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांद्वारे केली जाईल. यामध्ये चीन, भारत, व्हिएतनाम आणि फिलिपाइन्सचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.