‘सुपर फोर’मध्ये आज भारताचा बांगलादेशशी सामना
वृत्तसंस्था/ दुबई
तीव्र संघर्षात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर लढाऊ भारतीय संघाला बुधवारी बांगलादेशविऊद्ध होणाऱ्या आशिया चषक सुपर फोर सामन्यात काही दर्जेदार फिरकीपटूंचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आकडेवारीचा विचार करता हा आणखी एक एकतर्फी सामना वाटेल. कारण बांगलादेशने टी-20 स्वरूपात दोन्ही संघांमधील 17 सामन्यांमध्ये फक्त एकदाच विजय मिळवला आहे.
परंतु 2015 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकानंतर आणि मेलबर्न क्रिकेट मैदानावर रोहित शर्माला मिळालेल्या संशयाच्या फायद्यानंतर दोन्ही संघांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचे अनेक युवा चाहते हे भारताला शत्रू मानतात. शेख हसिना सरकार पाडल्यानंतर बांगलादेशशी भारताचे राजनैतिक संबंध तणावपूर्ण झाले आहेत. बीसीसीआयने या वर्षी ऑगस्टमध्ये ठरलेली मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार असल्यास ही मालिका होईल.
कागदावर बांगलादेशची भारताशी तुलना होऊ शकत नाही. टी-20 ही बांगलादेशची ताकद नाही आणि जर सगळे काही व्यवस्थित घडले, तर सूर्यकुमार यादवच्या संघास आणखी एक जबरदस्त विजय मिळू शकतो. पण या प्रकाराचे चंचल स्वरुप आणि बांगलादेशचा थोडासा चांगला फिरकी मारा यामुळे ते आश्चर्यचकीत होऊ शकतात. तथापि, दोन्ही संघांमधील फलंदाजांच्या दर्जातील फरक ही बाब शेवटी महत्त्वपूर्ण फरक घडवून आणले.
भारतीय संघातील सलामीवीर अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये असून त्याने जवळजवळ 210 च्या स्ट्राईक रेटने धावा जमविल्या आहेत, तर त्याचा साथीदार शुभमन गिलने गेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर आपला स्ट्राईक रेट जवळजवळ 158 वर पोहोचविला आहे. त्याच्या तुलनेत बांगलादेशचे दोन सर्वोत्तम टी-20 फलंदाज कर्णधार लिटन दास (स्ट्राईक रेट 129 हून अधिक) आणि तौहिद हृदॉय (124 हून अधिक) यांची आकडेवारी सुमार आहे.
बांगलादेशसाठी सर्वोत्तम संधी म्हणजे भारताला प्रथम फलंदाजी करायला लावणे आणि शेवटच्या षटकांत मुस्तफिजूर रहमानने, तर मधल्या षटकांत लेग-ब्रेक गोलंदाज रिशाद हुसेन आणि ऑफस्पिनर महेदी हसन या दोन्ही फिरकीपटूंनी धावांचा प्रवाह रोखून यशस्वी होण्याची अपेक्षा करणे. बांगलादेशच्या फलंदाजी विभागाकडे भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याइतपत पॉवर गेम नाही. परंतु भारताला 150-160 च्या दरम्यान रोखून ते काही प्रमाणात समस्या निर्माण करू शकतात. ते लक्ष्य त्यांच्यासाठी पाठलाग करण्यायोग्य असेल.
भारतासाठीही एक छोटीशी समस्या आहे, जी संघाच्या विश्लेषण विभागाने नक्कीच लक्षात घेतली असेल आणि ती म्हणजे या वर्षी तिलक वर्माचा फिरकीविऊद्धचा संघर्ष. प्रसिद्ध विश्लेषण साइट ‘क्रिक मेट्रिक’ने 2024 आणि 2025 मधील टी-20 तील तिलकच्या फिरकीविऊद्धच्या स्ट्राईक-रेटची माहिती दिली आहे. 2024 मध्ये तिलक पाच सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध 61 चेंडू खेळलह आणि 190 पेक्षा जास्त स्ट्राईक-रेटने 116 धावा केल्या. फिरकी गोलंदाजांविऊद्ध त्याची निर्धाव चेंडूंची टक्केवारी 21.3 होती. पण यंदा तिलकने सात डावांमध्ये 80 चेंडूंत फक्त 92 धावा केल्या आहेत, त्याचा स्ट्राईक रेट 115 आणि निर्धाव चेंडूंची टक्केवारी 38 इतकी राहिली आहे. हा डावखुरा गोलंदाज वेगवान गोलंदाजांविऊद्ध खूपच आरामदायी राहिला आहे आणि त्याने उत्तुंग फटक्यांसह मुक्तपणे धावा काढलेल्या आहेत.
पण फिरकी गोलंदाजांविऊद्ध जेव्हा चेंडू थोडासा उशिरा येतो तेव्हा तिलक वर्माला संघर्ष करावा लागला आहे. तिलक आणि संजू या दोघांनीही चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची अपेक्षा असल्याने, कोणत्याही सामन्यात वरची फळी कोसळली, तर त्यांना डाव सावरण्याचे काम करावे लागेल. रिंकू सिंग तिलकच्या तुलनेत फिरकी गोलंदाजी जास्त चांगल्या पद्धतीने खेळू शकणारा फलंदाज आहे. गेल्या काही वर्षांतील भारतीय संघ व्यवस्थापनाचा विचार केला, तर फलंदाजी विभागात बदल न करण्याकडे त्यांचा जास्त कल राहिलेला आहे. बांगलादेशकडे पाच गोलंदाज असून यामध्ये तीन आघाडीचे वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर, तस्किन अहमद आणि तन्झिम हसन सकीब आहेत. त्यांचा मारा असाधारण नसला, तरी चांगला आहे. मुस्तफिजूर आयपीएलचा अनेक वर्षांचा अनुभव आणि चेंडूच्या गतीतील बदलांसह काही समस्स्या नक्कीच निर्माण करेल, ज्यावर भारतीय फलंदाजांना तोडगा काढावा लागेल.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
बांगलादेश : लिटन दास (कर्णधार), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद ह्रदॉय, जाकेर अली, शमीम हुसैन, नुऊल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, तन्झीम हसन, तस्किन अहमद, शोरिफुल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.