For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत स्मार्ट, सर्वोत्तम पर्याय निवडणार

06:02 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत स्मार्ट  सर्वोत्तम पर्याय निवडणार
Advertisement

रशियाकडून कच्चे तेल खरेदीसंबंधी जयशंकर यांची स्पष्ट भूमिका : अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांच्या उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ म्युनिच

भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहणार आहे. पाश्चिमात्य देशांच्या दबावाखाली येत कुठलाच निर्णय घेणार नसल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. जर्मनीच्या म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये बोलताना त्यांनी भारताकडे कच्च्या तेलाचे अनेक स्रोत असून रशिया यातील एक असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

रशियासोबत व्यापार कायम ठेवत भारत अमेरिकेसोबतचे स्वत:चे वृद्धींगत होणारे संबंध कशाप्रकारे संतुलित करत आहे असा प्रश्न जयशंकर यांना विचारण्यात आला होता. ही काय समस्या आहे का? ही एक समस्या का असावी? आम्ही स्मार्ट आहोत. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, इतरांनी भारताचे याप्रकरणी कौतुक करण्याची गरज असल्याचे जयशंकर यांनी उत्तरादाखल म्हटले आहे.

24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. अशा स्थितीतही भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे. भारत रशियासोबतचे स्वत:चे संबंध कायम राखू इच्छितो, परंतु भारत अमेरिकेसोबतच्या स्वत:च्या संबंधांनाही महत्त्व देतो. भारत दोन्ही देशांसोबत चांगले संबंध राखण्यास सक्षम असल्याचे जयशंकर म्हणाले. रशिया एक स्रोत असून भारताला स्वत:च्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय निवडण्याचा अधिकार असल्याची भूमिका जयशंकर यांनी म्हटले आहे.

इस्रायलवरील हल्ला दहशतवादच

जयशंकर यांनी यावेळी गाझामधील स्थितीवरून चिंता व्यक्त केली. हमासने केलेले कृत्य हे दहशतवादी हल्लाच होते. परंतु पॅलेस्टाइनचा देखील एक असा मुद्दा आहे, ज्यावर तोडगा काढला जाणे अत्यंत आवश्यक आहे. पॅलेस्टाइन मुद्द्यावर द्विराष्ट्र तोडगा असायला हवा अशी भारताची भूमिका आहे. इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करावे, पॅलेस्टिनी लोकांच्या सुरक्षेला प्राथमिकता असायला हवी.  इस्रायल-हमास युद्धाचे 4 पैलू आहेत. 7 ऑक्टोबर रोजी जे घडले ते दहशतवादाचे स्वरुप होते हे स्पष्ट असायला हवे. इस्रायलला पॅलेस्टिनींच्या सुरक्षेकरता अत्यंत खबरदारी बाळगायला हवी होती. मानवी कायद्यांचे पालन करणे इस्रायलची आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे तसेच ओलिसांची मुक्तता देखील आवश्यक असल्याचे असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

चीनच्या विदेश मंत्र्यांशी धावती भेट

म्युनिच सिक्युरिटी कौन्सिलमध्ये चीनचे विदेशमंत्री वांग यी देखील सामील झाले. अधिकृतपणे भारत-चीनदरम्यान कुठलीच भेट झाली नाही, परंतु दोन्ही देशांचे विदेशमंत्री समोरासमोर आल्यावर त्यांच्यात काही वेळासाठी चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील उघड करण्यात आलेला नाही.

पाश्चिमात्यांच्या विरोधात नाही

म्युनिच सिक्युरिटी कौन्सिलमध्ये जयशंकर यांना ब्रिक्स संघटनेवरून प्रश्न विचारण्यात आला. सद्यकाळात पाश्चिमात्य देशांच्या विरोधात असणे आणि पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळे असणे या गोष्टीत फरक केला जाणे आवश्यक ओ. मी भारताला एक नॉन वेस्ट देश ठरवेन, जो पाश्चिमात्य देशांसोबतचे स्वत:चे संबंध वृद्धींगत करत आहे. हा प्रकार सर्व ब्रिक्स देशांच्या बाबतीत नाही. जी7 चा ज्याप्रकारे विस्तार झाला आणि नंतर ही संघटना जी20 झाली. जी-20 मध्ये ब्रिक्सच्या 5 सदस्यांचा समावेश आहे. एक संघटना म्हणून आम्ही योगदान दिले असल्याचे जयशंकर म्हणाले.

Advertisement
Tags :

.