For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-वेस्ट इंडिज दुसरी कसोटी आजपासून

06:05 AM Oct 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत वेस्ट इंडिज दुसरी कसोटी आजपासून
Advertisement

यजमान संघ संघर्ष करणाऱ्या विंडीजविऊद्ध आणखी एक सोपा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

आज शुक्रवारी येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आत्मविश्वासाने भरलेला यजमान संघ वेस्ट इंडिजच्या कमकुवत संघाचा सामना करेल तेव्हा घरच्या परिस्थितीत साई सुदर्शनचा संयम आणि नितीशकुमार रेड्डीची उपयुक्तता पडताळून पाहणे यास भारताच्या यादीत प्राधान्य असेल.  आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही अव्वल संघात प्रवेश करण्यास सक्षम असलेल्या प्रतिभावान क्रिकेटपटूंनी भरलेला भारताचा उत्तम संघ वेस्ट इंडिज संघाच्या तुलनेत खूपच बळकट आहे. विंडीज संघ त्याच्या गौरवशाली भूतकाळाचा फिकट सावलीसारखा दिसतो आणि पारंपरिक स्वरूपात तो संघर्ष करत आहे. हा एक असा संघ आहे ज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात फारसे इच्छुक नसलेले खेळाडू असून त्यांना टी-20 लीगमधील कुठलाही संघ देखील घेणे पसंत करणार नाही. अहमदाबादमध्ये प्रतिकाराशिवाय डावाचा पराभव कॅरिबियन क्रिकेटमधील सध्याच्या उताराची साक्ष देतो.

Advertisement

भारतासाठी आणखी एक प्रभावी कामगिरी केवळ मालिका संपवण्यापुरती मर्यादित नाही, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेवरील पकड मजबूत करणे आणि या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविऊद्ध घरच्या मैदानावर समोर येणार असलेल्या अधिक कठीण आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाणे याच्याशी देखील ते निगडीत आहे. फिरोजशाह कोटला येथील मैदानाचे स्वरूप पाहता आणखी एक सामना लवकर संपण्याची चिन्हे दिसत आहेत. साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी एक ’कोरडा भाग’ नजरेस आणून दिला आहे, जो त्यांना वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकतो, असे वाटते. त्यामुळेच नितीश त्याचे स्थान कायम ठेवेल असे वाटते. नितीशचा या स्वरूपात गोलंदाजीवर भर आहे.

भारताच्या फलंदाजीची खोली मोठी आणि सुरक्षित असल्याने मध्यमगती गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू म्हणून नितीशची उक्रांती संघ व्यवस्थापन दीर्घकाळात जोपासण्यास उत्सुक आहे. निवड समिती आणि प्रशिक्षक हे साई सुदर्शनबद्दल अद्याप फारसे चिंतीत नाहीत. परंतु मागील सात डावापैकी सहा डावांमध्ये तो अपयशी ठरला असून कसोटी स्वरूपात त्याला अजून लय सापडली नसल्याचे यावरून दिसून येते. यशस्वी जैस्वालने सुऊवात चांगली केलेली आहे, तर के. एल. राहुलने गेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत आणि कर्णधार शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले आहे. ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनीही शतके झळकावली आहेत. गिलचा पाठिंबा असला, तरी, सुदर्शन चांगली कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक असेल. कारण आपली जागा घेण्यास आणखी इच्छुक रांगेत उभे आहेत याची त्याला पूर्ण जाणीव असेल.

परंतु एकंदरित पाहता दोन्ही संघांमधील फरक तंत्र किंवा स्वभावाच्या पलीकडे जातो, तो दिशा आणि विश्वासाबद्दल आहे. भारताचा ड्रेसिंग रूम उद्देशांनी गजबजलेला दिसत असताना वेस्ट इंडिज एका चक्रात अडकलेला दिसतो, ज्याचे स्पष्टीकरण त्यांच्या दिग्गजांनाही देणे कठीण वाटते. मुख्य प्रशिक्षक डॅरेन सामी यांनी दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला स्पष्टपणे सांगितले की, ही घसरण एक जीवघेणा आजार आहे, ज्याचा इलाज सध्या अशक्य दिसत आहे. मंगळवारी संध्याकाळी भारतीय संघ मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या निवासस्थानी जेवणासाठी जमलेला असताना वेस्ट इंडिजचे खेळाडू जवळच्या गोल्फ कोर्समध्ये अनौपचारिक मार्गदर्शन सत्रासाठी गेले.  तिथे तीन महान खेळाडू-सर व्हिवियन रिचर्ड्स, सर रिची रिचर्डसन आणि ब्रायन लारा यांनी अडचणीत सापडलेल्या संघाला संबोधित केले. ज्ञानाचे हे मोती प्रेरणा देऊन तात्पुरता प्रतिकार घडवू शकतात का, हे पाहावे लागेल. पण सध्या तरी प्रत्येक गोष्ट आणखी एक भारतीय विजय अपरिहार्य असल्याचे सूचित करते. कदाचित आणखी एक तीन दिवसांत संपलेला सामना पाहायला मिळू शकतो. कोटलाची खेळपट्टी, प्रामुख्याने काळ्या मातीची खेळपट्टी फटकेबाजीला पोषक वाटते आणि जर भारताने प्रथम फलंदाजी केली, तर वरची फळी पुन्हा एकदा विंडीजच्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेण्यास उत्सुक असेल. पहिल्या कसोटीत फक्त जेडेन सील्स तेवढा विंडीजतर्फे गोलंदाजीत चमकदार दिसला होता.

  • भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, बी. साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी , वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, नारायण जगदीशन, देवदत्त पडिक्कल.
  • वेस्ट इंडिज : रोस्टन चेस (कर्णधार), तेगनारिन चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, अलिक अॅथनेझ, ब्रँडन किंग, जोहान लेन, जस्टिन ग्रीव्हज, खरी पियरे, शाई होप, जेडेन सील्स, जमेल वॉरिकन, केव्हलॉन अँडरसन, जेडिया ब्लेड्स, टेविन इम्लाच, अँडरसन फिलीप

सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.

Advertisement
Tags :

.