भारत - वेस्ट इंडिज पहिली कसोटी आजपासून
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
वादग्रस्त आशिया चषक जिंकून वेगळी उंची गाठल्यानंतर अल्पावधीतच आज गुऊवारपासून येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत जेव्हा भारत व वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने येतील तेव्हा शुभमन गिलच्या भारताचे पारडे पूर्णपणे भारी असेल. कर्णधार गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह भारतीय संघाचे बहुतेक सदस्य सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान रात्री दुबईहून येथे आले आणि त्यांनी कसोटी क्रिकेटसाठी स्वत:ला तयार करण्याच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुण देखील उपलब्ध असल्याने निश्चितच या कसोटी मालिकेचे महत्त्व जास्त आहे. इंग्लंड येथे झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी साधली, त्यामुळे गिलचा संघ तिसऱ्या स्थानावर आणि इंग्लंडपेक्षा एक स्थान वर राहिला आहे आणि गुऊवारपासून येथे सुरू होणारा हा सामना घरच्या मैदानावरील चार सामन्यांपैकी पहिला असेल. यामध्ये यजमान शक्य तितके गुण जोडण्याचा प्रयत्न करतील. अहमदाबादमध्ये यावेळी ढगाळ वातावरणात हिरवीगार खेळपट्टी असल्याने खेळण्याची परिस्थिती खूपच वेगळी असल्याचे दिसून येत आहे. उष्ण आणि दमट वातावरण असले, तरी कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. परंतु खेळ वाया जाण्याची भीती नाही. 2025-27 च्या जागतिक कसोटी स्पर्धेत वेस्ट इंडिजने तीनही कसोटी गमावल्या आहेत आणि दोन्ही प्रतिस्पर्धी संघांमधील दरी लक्षणीयरीत्या जास्त आहे.
चार घरच्या कसोटींपैकी पहिल्या सामन्यासाठी हिरवीगार खेळपट्टी पाहता याचा अर्थ असा होऊ शकतो की, भारत सध्या फिरकीस पोषक खेळपट्ट्यांच्या त्यांच्या पसंतीपासून दूर जात आहे. गेल्या हंगामात न्यूझीलंडविऊद्धच्या पराभवाला फिरकीस पोषक खेळपट्ट्या कारणीभूत ठरल्या होत्या. खरे तर नोव्हेंबर, 2024 मध्ये भारत त्यांचा शेवटचा घरचा कसोटी सामना खेळल्यापासून बरेच काही बदलले आहे. महान फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दिग्गज रविचंद्रन अश्विनसह मैदान सोडले आहे. मोहम्मद शमीही नाही. पण यापैकी कोणत्याही गोष्टीने भारताच्या विविध विभागांच्या ताकदीला कमी केलेले नाही.
भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी विभागात स्थिरता आणली आहे. पण संघाचा थिंक-टँक देवदत्त पडिक्कलच्या रूपात अतिरिक्त फलंदाज निवडतो की, नितीश रे•ाrच्या रूपात मध्यमगती गोलंदाजी टाकू शकणारा अष्टपैलू खेळाडू निवडतो हे पाहणे बाकी आहे. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे प्राथमिक फिरकी गोलंदाज असण्याची अपेक्षा आहे. परंतु भारत वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यांच्यासह फिरकी आक्रमण मजबूत करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हॅम्पशायरच्या वतीने काउंटी जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर वॉशिंग्टनने मंगळवारी संघासोबत सराव केला.
तिसऱ्या क्रमांकावर कऊण नायर आपले स्थान पक्के करण्याच्या बाबतीत अपयशी ठरल्याने बी. साई सुदर्शनला या प्रतिष्ठेच्या स्थानावर स्पष्ट संधी असेल. के. एल. राहुलने नाबाद 176 धावांची शानदार खेळी करून दुसऱ्या अनधिकृत कसोटीत ऑस्ट्रेलिया ’अ’विऊद्ध भारत ‘अ’ संघाला पाच गड्यांनी विजय मिळवून दिला होता. तो इंग्लंड दौऱ्यानंतरच्या विश्रांतीनंतर आपला फॉर्म कायम ठेवण्यास उत्सुक असेल. यशस्वी जैस्वाललाही इंग्लंड दौऱ्याच्या समाप्तीपासून चांगला ब्रेक मिळाला आहे. तो आशिया चषक मोहिमेचा भाग नव्हता किंवा ’अ’ संघांदरम्यानच्या मालिकेचा भाग नव्हता. सदर मालिकेत त्याचे इतर काही सहकारी राहुल, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा होते. आशिया कपमध्ये संमिश्र कामगिरी केलेला कर्णधार गिल इंग्लंडमधील आपला अविश्वसनीय फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. तिथे त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये 754 धावा केल्या होत्या.
दुसरीकडे, वेस्ट इंडिजची परिस्थिती बिकट झालेली आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्ध जमैका येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात 27 धावांवर बाद झाल्याने त्यांची लाजिरवाणी स्थिती झाली. हा त्यांचा नीचांक आहे आणि त्यांच्या समस्यांवर त्वरित उपाय निघताना दिसत नाही. दुखापतींमुळे वेगवान गोलंदाज शमार जोसेफ आणि अल्झारी जोसेफ बाहेर पडल्यामुळे त्यांच्या गोलंदाजीतील बरीच ताकद कमी झाली आहे. यामुळे पाहुण्या संघाला त्यांच्या दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांवर अधिक अवलंबून राहावे लागू शकते. वेगवान गोलंदाजीत जेडेन सील्स व फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. कारण वॉरिकनचा फिरकी गोलंदाजी साथीदार खारी पियरे हा निवड झाल्यासच कसोटी पदार्पण करू शकेल. या कसोटी दौऱ्यासाठी क्रेग ब्रेथवेटला वगळणाऱ्या वेस्ट इंडिजने टॅगेनरिन चंद्रपॉल आणि अॅलिक अथानाझे यांना परत बोलावून त्यांची फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्णधार चेजवर अतिरिक्त जबाबदारी असेल. कारण तो दौऱ्यातील एकमेव उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे.
संघ: भारत: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के। एल. राहुल, ध्रुव जुरेल, एन जगदीशन, देवदत्त पडिक्कल, बी. साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, नितीशकुमार रे•ाr, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिज: रोस्टन चेज (कर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अॅलिक अथानाझे, जॉन कॅम्पबेल, टॅगेनरिन चंद्रपॉल, शाई होप, टेविन इमलाच, ब्रँडन किंग, जस्टिन ग्रीव्हज, जोहान लेन, खारी पियरे, जोमेल वॉरिकन, जेडेन सील्स, अँडरसन फिलिप, जेडिया ब्लेड्स.
सामन्याची वेळ: सकाळी 9:30 वा.