महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची बांगलादेशविरुद्धची टी-20 मालिका आजपासून

06:10 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ग्वाल्हेर

Advertisement

बांगलादेशविऊद्धची भारताची तीन ‘टी-20’ सामन्यांची मालिका आज रविवारपासून सुरू होत असून यात वेगामुळे प्रसिद्धीत आलेला मयंक यादव आपली चमक दाखविण्याची अपेक्षा आहे, तर भारताच्या नियमित टी-20 खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना प्रतिभा दाखविण्याची आणखी एक संधी मिळेल. मयंकने या वर्षाच्या सुऊवातीस आपल्या पहिल्या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे बाहेर पडण्यापूर्वी ताशी 150 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगाने सातत्याने गोलंदाजी केल्यामुळे क्रिकेट जगताचे लक्ष वेधले होते. सहसा राष्ट्रीय संघात निवडीसाठी विचार होण्याच्या दृष्टीने एखाद्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध करावा लागतो. परंतु या 22 वर्षीय खेळाडूला त्याच्या विशेष कौशल्याचा विचार करून संघात जलदरीत्या स्थान देण्यात आले आहे. बांगलादेशविऊद्धची मालिका त्याच्या फिटनेस आणि स्वभावाची कसोटी पाहणारी असेल. आयपीएलमध्ये त्याने दाखवलेली अचूकता आणि नियंत्रण तो येथे दाखवू शकतो का हे पाहावे लागेल.

Advertisement

मयंकव्यतिरिक्त दिल्लीचा सहकारी वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार हे देखील या मालिकेत भारताकडून पदार्पण करू शकतात. न्यूझीलंडविऊद्धच्या कसोटींना प्राधान्य दिल्याने शुभमन गिल, रिषभ पंत, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना बांगलादेशविऊद्धच्या टी-20 मध्ये विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या ही दोन मोठी नावे संघात आहेत तसेच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेले शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगही आहेत.

नियमित खेळाडूंना ब्रेक मिळाल्याने अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. संजू सॅमसनलाही सलामीला येण्याची संधी मिळू शकते. रियान परागला जुलैपासून केवळ सहा टी-20 सामने मिळाले आहेत. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध जोरदार प्रभाव पाडण्याची त्याला आणखी एक संधी मिळेल. या मालिकेतून फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीचे पुनरागमन होणार असून संघातील दुसरा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आहे. राखीव यष्टिरक्षक म्हणून निवड झालेला जितेश शर्मा जूनमध्ये झालेल्या आयपीएलनंतर खेळलेला नाही.

दुसरीकडे, शाकिब अल हसनने निवृत्ती पत्करलेली असल्याने बांगलादेशला या अष्टपैलू खेळाडूशिवाय उतरावे लागेल. ऑफस्पिनर मेहदी हसन मिराझला 14 महिन्यांनंतर संघात बोलावण्यात आले आहे. अनुभवी फलंदाज महमूद उल्लाहला  या मालिकेत चमक दाखविता आल्यास त्याला वाटचाल पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने आणखी प्रेरणा मिळू शकते. दरम्यान, या सामन्यामुळे 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार असून शहराच्या सीमेवर बांधलेला श्रीमंत माधवराव सिंदिया स्टेडियम रविवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणार आहे. शहरातील कॅप्टन रूपसिंह स्टेडियमवर 2010 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता.

संघ-भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीशकुमार रे•ाr, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वऊण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, महमूद उल्लाह, लिटन दास, जाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराझ, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शेरिफूल इस्लाम, तनझीम हसन साकिब, रकीबुल हसन.

14 वर्षानंतर खेळवला जाणार ग्वाल्हेरमध्ये सामना

ग्वाल्हेरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये भारत व बांगलादेश यांच्यात पहिला टी 20 खेळवला जाणार आहे. तब्बल 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होणार आहे. 2010 साली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे शेवटचा सामना झाला होता. त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावून इतिहास रचला होता. त्यावेळी तो 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. तो सामना शेवटचा ठरला. आता 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, 14 वर्षांपूर्वी जो सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवण्यात आलेला तो कॅप्टन रूपसिंग स्टेडियममध्ये होता. यानंतर आता 14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमधील एका नवीन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम असे या स्टेडियमचं नाव आहे. या वर्षी जूनमध्ये याचे काम पूर्ण झाले आहे. आता प्रथमच या स्टेडियम क्रिकेटचे सामने आयोजित केले जाणार आहेत.

ग्वाल्हेरमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त

ग्वाल्हेर शहरात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत 6 ऑक्टोबर रोजी होणारा भारत-बांगलादेश क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी केली. शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या ‘अत्याचार‘ विरोधात हा निषेध करण्यात आला. आता उजव्या विचारसरणीच्या संघटनेने 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे. अशा स्थितीत प्रशासनाने ग्वाल्हेरमध्ये पुढील सोमवारपर्यंत (7 ऑक्टोबर) कलम 163 लागू करण्यात आले आहे. ग्वाल्हेरमधील क्रिकेट मैदानाभोवती आणि मैदानाच्या आत 2,500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही संघ ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article