महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत वि. ऑस्ट्रेलिया...आज विश्वचषकाचा ‘सुपर संडे’

06:58 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

भारतातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप आता जवळ पोहोचला असून आजच्या ‘सुपर संडे’मध्ये स्पर्धेत पूर्णपणे अजिंक्य राहिलेला भारत आणि पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम झुंज होणार आहे. क्रिकेट रसिकांची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली असून अहमदाबादेतील सर्वांत मोठा क्रिकेट स्टेडियम पूर्ण क्षमतेने भरून जाणे ठरलेले आहे. हा सामना उत्कंठावर्धक व्हावा अशी  क्रिकेट शौकिनांची अपेक्षा असेलच. पण त्याचबरोबर एक अब्जाहून अधिक भारतीय चाहत्यांची रोहित शर्माच्या संघानेच विश्वचषक उचलावा अशी इच्छा राहणार असून त्या आशेने ते टीव्ही संच व स्मार्टफोनकडे डोळे लावून बसतील.

Advertisement

भारताची विजयी घोडदौड कायम राखून इतिहासावर स्वत:ची वेगळी छाप उमटविण्याचा हेतू बाळगून असलेल्या कर्णधार रोहित शर्माकडे त्यादृष्टीने सक्षम 10 खेळाडू आहेत. एकंदरित चमूचा विचार करता त्यापैकी विराट कोहली व रविचंद्रन अश्विन यांना एकदिवसीय विश्वचषक परत जिंकण्याची भावना काय असते ते माहीत आहे, तर 2007 मध्ये भारताने जेव्हा त्यांचा पहिला ‘टी20’ विश्वचषक जिंकला तेव्हा जोहान्सबर्गमध्ये स्वत: रोहित शर्मा त्याकामी आघाडीवर होता.

पण आज होणारा अंतिम सामना पूर्णपणे वेगळा असेल. जिंकण्याची गरज असलेली ही केवळ एखादी क्रिकेट स्पर्धा नाही, तर या खेळात गुंतलेल्या सर्वांच्या भावनांची काळजी घेणेही आवश्यक आहे. रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितले आहे की, त्यांना बाहेरील आवाजाची पर्वा नसते. पण त्या आवाजामुळेच या खेळाला आणि संघाला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे हे नाकारता येणार नाही. या खेळाडूंना दैवतावत मानणारे चाहते, प्रचंड खर्च करून सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकत घेणारे ब्रॉडकास्टर आणि खेळाला पाठिंबा देणारे प्रायोजक या सर्वांना खेळाची भरभराट व्हावी आणि तो टिकून राहावा असे वाटते. त्यादृष्टीने आजच्या सामन्याला विलक्षण महत्त्व आहे.

1983 मध्ये लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देवने चषक उचलून भारतीय वर्चस्वाची सुऊवात केली होती. त्यानंतर 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने विजयी षटकार खेचून भारतीय वर्चस्व सिद्ध केले होते. आता भारतीय क्रिकेट संघ केवळ तिसरे एकदिवसीय जागतिक विजेतेपद जिंकण्याचाच विचार करत नसेल, तर एकदिवसीय क्रिकेटला नवी संजीवनी देण्याचीही इच्छा बाळगून असेल. भारतीय विजयामुळे टिकाव धरण्यासाठी धडपडणाऱ्या क्रिकेटच्या या प्रकाराला आवश्यक ती चालना मिळू शकेल.

रोहितच्या संघाला इतिहास रचण्याची संधी

11 विजयांसह आजपर्यंत कोणत्याही संघाने विश्वचषक जिंकलेला नाही. इंग्लंडला 2019 मध्ये त्यांच्या विजेतेपदाच्या मार्गात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. रोहित शर्माच्या संघापुढे इतिहास रचण्याची संधी आहे. कारण जर संघाने विश्वचषक जिंकताना सलग 11 वा विजय मिळवला, तर तो एक नवीन विक्रम होईल आणि तो मोडणे कठीण असेल.

विजयाची अपेक्षा उंचावलेला प्रथमच विश्वचषक

यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्या आहे. ते असे की, भारताच्या विजयाची अपेक्षा उत्तुंग असणारा हा प्रथमच विश्वचषक आहे. कारण 1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. पण त्यावेळी भारताच्या विजयाची अपेक्षा बव्हंशी लोकांनी केली नव्हती. 2011 चा विश्वचषक भारत जिंकेल अशी अपेक्षा कमी प्रमाणातच होती. तथापि, यावेळी प्राथमिक फेरीत भारताने सर्व प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केल्याने भारतच विश्वचषक जिंकणार, ही अपेक्षा कधी नव्हे इतक्या उत्तुंग पातळीवर जाऊन पोहचली आहे. ती पूर्ण होते की नाही, हे अवघ्या काही तासांमध्ये सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींना समजणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article