कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थानच्या भूमीवर भारत-युएईचा संयुक्त सैन्याभ्यास

06:45 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

14 दिवस चालणार सैन्याभ्यास

Advertisement

वृत्तसंस्था/ जोधपूर

Advertisement

भारत आणि संयुक्त अरब अमिरातच्या सैन्यांदरम्यान 2 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत संयुक्त सैन्याभ्यास पार पडणार आहे. या संयुक्त सैन्याभ्यासला डेझर्ट सायक्लोन 2024 नाव देण्यात आले आहे. हा सैन्याभ्यास राजस्थानात आयोजित होणार आहे.

भारतीय सैन्याने या सैन्याभ्यासासंबंधी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तसेच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांचे संबंध अत्यंत दृढ आहेत. दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित झाले आहेत.

दोन्ही देशांदरम्यान सैन्याभ्यासाचा उद्देश संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांमध्ये संरक्षण उपकरणांचे उत्पादन आणि विकास, सशस्त्र दलांचा संयुक्त सराव, विशेष स्वरुपात सागरी अभ्यास, रणनीति आणि तत्वांबद्दल जाणून घेणे, मध्यवर्ती जेट ट्रेनरच्या संबंधी तांत्रिक सहकार्य वाढविणे असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article