महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्व कसोटी मानांकनात भारत अग्रस्थानी

06:33 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

रविवारी घोषित करण्यात आलेल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप ताज्या मानांकन यादीत भारताने अग्रस्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीच्या या स्पर्धेत भारतीय संघाने यापूर्वी दोन वेळेला अंतिम फेरी गाठली होती.

Advertisement

सध्या भारतात इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेत यजमान भारताने रांचीच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 5 गड्यांनी पराभव करत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता भारताने न्यूझीलंडला गुणांच्या टक्केवारीत मागे टाकले आहे. भारताने 64.58 गुण मिळविले असून त्यांनी गेल्या 8 सामन्यात 5 विजय 2 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राखत 62 गुण घेतले आहेत. तर न्यूझीलंडने गेल्या 5 सामन्यात 3 विजय आणि 2 पराभव नोंदविले असून त्यांचे 36 गुण झाले आहेत. न्यूझीलंडने अलिकडेच ऑस्ट्रेलिया बरोबरच्या पहिल्या कसोटीत हार पत्करली आहे. वेलिंग्टन कसोटीपूर्वी न्यूझीलंडचा संघ गेल्या 4 सामन्यातून 36 गुणासह आघाडीवर होता. तसेच त्यानी 75 टक्के गुणांची नोंद केली होती. न्यूझीलंडचा संघ आता या मानांकनात दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टनची कसोटी जिंकत 12 महत्त्वाचे गुण मिळविले. आता त्यांनी गेल्या 11 सामन्यातून 78 गुण घेतले असून त्यांनी 7 विजय 3 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राखला आहे. ऑस्ट्रेलियाची गुण टक्केवारी 55 ते 59.09 अशी वाढली आहे. 2023 च्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपद मिळविले होते. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी क्राईस्ट चर्च येथे होणार आहे. ही कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली तर ते आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात न्यूझीलंडला मागे टाकू शकतील. ही कसोटी 8 मार्चपासून खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी 7 मार्चपासून धर्मशाला येथे सुरू होणार आहे. या कसोटीत इंग्लंडने भारताचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात अग्रस्थानावर आरुढ होईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article