आशियाई कप पात्रता फेरीत भारताचा सामना आज सिंगापूरशी
वृत्तसंस्था / सिंगापूर
राष्ट्रीय शिबिराच्या पहिल्या अर्ध्या टप्प्यात अनेक खेळाडूं सामील झाले नव्हते. त्यामुळे आज गुरूवारी सिंगापूरविरुद्ध येथे होणाऱ्या एएफसी आशियाई कप पात्रतेच्या तिसऱ्या फेरीचा सामना कठीण जाऊ शकतो. सायंकाळी 5 वाजता हा सामना सुरू होईल.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सीएएफए नेशन्स कपसाठी विश्रांती देण्यात आल्यानंतर सुनील छेत्री संघात परतला असला तरी, खालिद जमीलच्या संघाने इतक्या महत्त्वाच्या सामन्यासाठी जेमतेम एक आठवडा एकत्र सराव केला आहे. बांगलादेश (0-0) आणि हाँगकाँग (0-1) विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात एक गुण मिळवून भारत चार संघांच्या गट क मध्ये तळाशी आहे. दुसरीकडे सिंगापूर सध्या दोन सामन्यांत चार गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. गुरूवारी कोणतीही चूक झाल्यास 2027 मध्ये होणाऱ्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या भारताची संधी धोक्यात येऊ शकते. ज्यासाठी फक्त गट विजेतेच स्थान मिळवू शकतील. 20 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या बेंगळूर येथील राष्ट्रीय शिबिरासाठी जमील यांनी 30 खेळाडूंची नावे जाहीर केली होती. परंतु छेत्रीसह 14 खेळाडूंना क्लबने सोडले नाही.
नंतर बहुतेक खेळाडू सप्टेंबरच्या अखेरीस शिबिरात सामील झाले. म्हणजेच सोमवारी रवाना होण्यापूर्वी ते फक्त एक आठवडा संघासोबत होते. पहिल्या अर्ध्यात शिबिरात फक्त दोन बचावपटू उपस्थित असल्याने असहाय जमील यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) आणि क्लबना या जुन्या अडचणींवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. गेल्या महिन्यात सीएएफए नेशन्स कप दरम्यान गालाच्या हाडाच्या फ्रॅक्चरमुळे झालेल्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यानंतर अनुभवी बचावपटू संदेश झिंगनला 23 जणांच्या अंतिम संघात स्थान मिळणे ही भारतासाठी चांगली बातमी होती. भारत क्रमवारीत 134 व्या तर सिंगापूर 158 व्या स्थानावर आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्डच्या बाबतीत दोन्ही संघांमध्ये वेगळे करण्यासारखे काहीही नाही. भारताने 12 तर सिंगापूरने 11 सामने जिंकले आहेत. चार सामने अनिर्णीत राहिले. दोन्ही संघांमधील शेवटची लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. 2022 मध्ये झालेल्या या सामन्यात आशिक कुरूनियानने इखसान फंदीचा गोल रद्द केला होता. मात्र मायदेशात सिंगापूरने भारतावर आठ विजय मिळविले तर भारताने 6 विजय मिळविले आहेत. यातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. सिंगापूरमध्ये शेवटच्या वेळी दोन्ही संघ आमनेसामने आले तेंव्हा लायन्सने 2012 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात 2-0 असा विजय मिळवला होता. दोन्ही मुख्य प्रशिक्षक त्यांच्या कामात तुलनेने नवीन आहेत. जूनमध्ये सिंगापूरचे प्रशिक्षक गॅविन ली यांची अंतरिम कामगिरीवर नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांनी म्यानमारविरुद्ध (1-1) अशी बरोबरी साधली होती आणि गेल्या महिन्यात मलेशियाविरुद्ध (1-2) पराभव पत्करावा होता. तथापि, सप्टेंबरमध्ये मलेशिया आणि म्यानमाररुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये दुखापतग्रस्त झालेल्या कर्णधार आणि बचावपटू हॅरिस हारूनच्या पुनरागमनामुळे सिंगापूर उत्साहीत होईल. सिंगापूरमध्ये काही खेळाडू आहेत जे परदेशी लीगमध्ये आपला व्यवसाय करत आहेत. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे फॉरवर्ड इखसान फंदी, ज्याने 41 सामन्यांमध्ये 21 आंतरराष्ट्रीय गोल केलेआहेत. 26 वर्षीय हा खेळाडू थाई लीग 1 मध्ये रत्वाबुरी एफसीसाठी खेळतो. आणखी एक परदेशी खेळाडू 19 वर्षीय जोनन टॅम पोर्तुगालच्या अंडर 23 राष्ट्रीय लीगमध्ये विझेला एफसीसाठी खेळतो. त्याने लायन्सकडून पहिल्यांदाच कॉलअप मिळवला आहे. दुसरीकडे जमीलने ऑगस्टमध्ये नियुक्ती झाल्यानंतर सकारात्मक सुरूवात केली होती. त्याने छेत्री शिवाय ताजिकिस्तानमधील सीएएफइ नेशन्स कपमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी संघाचे मार्गदर्शन केले.
भारताने ताजिकिस्तानला हरवले. इराणकडून पराभव पत्करला आणि गट टप्प्यात अफगाणिस्तानशी बरोबरी साधली आणि तिसऱ्या स्थानाच्या प्ले ऑफमध्ये ओमनला पेनल्टी शूटआऊटवर हरवले. भारताचे मुख्य प्रशिक्षक जमीलने सीएएफए नेशन्स कम संघात 10 बदल केले आहेत. ज्यात ब्रँडन फर्नांडीस, सहल अब्दुल समद, फारुख चौधरी आणि लिस्टन कोलाको हे खेळाडू आहेत. जमीलने पात्रता फेरीतील उर्वरित सामने एकावेळी एक घण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गुरूवारी झालेल्या मैदानाबाहेरील सामन्यानंतर, भारताचा सामना 14 ऑक्टोबर रोजी गोवातील मडगाव येथे सिंगापूरशी होईल.
सामना सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता