भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा व शेवटचा कसोटी सामना आजपासून येथे सुरू होत असून शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला अत्यंत आव्हानात्मक नेतृत्वाच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल. कारण भारताला चांगल्या प्रकारे सज्ज असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी साधण्याचे कठीण काम करावे लागणार आहे. येथील खेळपट्टीवर चेंडू लक्षणीय प्रमाणात वळेल असा अंदाज आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी ही आणखी कठीण परीक्षा आहे. त्यांच्या गोंधळात टाकणाऱ्या सूचनांमुळे ड्रेसिंग रूम आणि थिंक टँक स्पष्टतेसाठी झगडत आहेत. गेल्या तीन दशकांपासून भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळताना अजिंक्यतेचा जो आभास व्हायचा तो सध्याच्या कसोटी सामन्यात नाहीसा झाला आहे. संघ आता कमकुवत दिसत आहे. मागील अनेक वर्षांत पहिल्यांदाच भारताचे पारडे घरच्या मैदानावर जड दिसत नसून अंडरडॉग्स म्हणून ते मैदानात उतरणार आहेत.
कोणत्याही खेळाडूला विचारा आणि तो सांगेल की, ही चांगली स्थिती नाही. जर 2024 मध्ये न्यूझीलंडची फिरकी जोडी एजाज पटेल आणि मिशेल सँटनर यांनी भारत मायदेशी अजिंक्य असल्याच्या समजुतीला तोडून टाकले असेल, तर आता सायमन हार्मर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तऊण भारतीय संघाला आणखी उघडे पाडले आहे. फिरकीपटूंना हाताळण्यासाठी योग्य तंत्राचा अभाव स्पष्ट आणि धक्कादायक आहे. त्यात भर म्हणून खेळपट्टीच्या बाबतीत मानसिकतेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. बीसीसीआयमधील महत्त्वाच्या व्यक्तींच्या पाठिंब्यासह गंभीर हे त्यांच्या पदाच्या बाबतीत पूर्णपणे सुरक्षित आहे, परंतु दोन ‘सेना’ देशांविऊद्ध घरच्या मैदानावर 0-5 अशी कामगिरी त्यांच्या प्रशिक्षक म्हणून वारशाचे कायमचे नुकसान करेल आणि कितीही आयसीसी चषक मिळविले, तरी त्या पैलूला डावलण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाहीत.
या कठीण परिस्थितीत गिलच्या अनुपस्थितीत पंत नेतृत्व स्वीकारेल. त्याला चांगलेच माहित असेल की, लाल मातीच्या बारसापरा खेळपट्टीवर त्याची फलंदाजी त्याच्या निर्णयांइतकीच महत्त्वाची असेल. मानेच्या दुखापतीमुळे गिल कधीही दुसरी कसोटी खेळण्याच्या शर्यतीत नव्हता आणि हे नेहमीच स्पष्ट होते. परंतु भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्टता टाळण्याच्या त्यांच्या वृत्तीप्रमाणे जोपर्यंत ते नाकारणे अशक्य आहे तोपर्यंत ते नाकारत राहिले. विश्वसनीय सूत्रांनुसार, हा 26 वर्षीय खेळाडू विश्रांती घेण्यासाठी आणि बरे होण्यासाठी शहरातून निघून गेला आहे. गिलची जागा घेण्याच्या बाबतीत साई सुदर्शन हा सर्वांत मजबूत दावेदार असल्याचे दिसून येत आहे. मात्र तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल की, वॉशिंग्टन सुंदरला पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार हे पाहावे लागेल.
कर्णधारपदाच्या अनुभवाचा विचार केला, तर काही वर्षांपूर्वी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती तेव्हा पंतने याच प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व केले होते. पण त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये निर्णय घेण्याच्या कौशल्याबद्दल पुरेशी माहिती नाही. 2017 मध्ये पंतने दिल्ली संघाला रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचविले होते आणि अंतिम विजेत्या विदर्भकडून त्यांनी पराभव पत्करला होता. तथापि, तज्ञांना अधिक रस कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या संध्याकाळी आणि तिसऱ्या सकाळी त्याने घेतलेल्या निर्णयांत आहे.
दुसऱ्या संध्याकाळी खेळ संपेपर्यंत भारताने फिरकी गोलंदाजांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची 7 बाद 93 अशी घसरण घडविली होती. पण तिसऱ्या दिवशी सकाळी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे चेंडू सोपवण्यापूर्वी पंतने बरीच प्रतीक्षा केली. तोपर्यंत टेम्बा बावुमाने अतिरिक्त 60 धावा जोडल्या, ज्या निर्णायक ठरल्या. यष्ट्यांमागे उत्साही गप्पागोष्टी करणारा पंत गोलंदाजांना प्रोत्साहन देणारा असला, तरी संघ निवडीच्या बाबतीत काही विवेकी निर्णय घेण्यासाठी कर्णधार पंतला त्याच्या प्रशिक्षकांना बाजू पटवून द्यावी लागेल. संघात बरेच म्हणजे सात डावखुरे फलंदाज असल्याने गुऊवारी खेळपट्टीवर दिसणारे गवताचे आवरण बीसीसीआयचे क्युरेटर तापोश चॅटर्जी आणि आशिष भौमिक यांनी काढून टाकले, तर ऑफ स्पिनर सायमन हार्मरला बहर येऊ शकतो.
कोणत्याही परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांची या मैदानावरील पहिली कसोटी चुकीच्या कारणांसाठी लक्षात रहावी अशी इच्छा नसेल. म्हणूनच फिरकीपटूंपैकी एक, अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव अष्टपैलू नितीशकुमार रे•ाrसाठी जागा खाली करू शकतो. तिसरा वेगवान गोलंदाज उपलब्ध झाल्यास भारताला खेळपट्टीत कोणताही ओलावा असल्यास त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकते. जर त्याची गोलंदाजी आवश्यक नसेल, तर, फलंदाजीमध्ये आक्रमक दृष्टिकोन असलेला असा उजव्या हाताचा फलंदाज असणे अशा प्रकारच्या खेळपट्टीवर मदत करू शकते.
पण शेवटी हे सर्व खेळपट्टीचे गुलाम होण्यापेक्षा खेळाडूंवर विश्वास ठेवण्यावर अवलंबून असते. विश्वासाचा विचार केला तर, मुख्य प्रशिक्षक पुन्हा एकदा मायभूमीतील मालिका गमावण्यापूर्वी ठोस उपाययोजना करण्याची इच्छा बाळगून असतील. ही मालिका देखील जर गमवावी लागली, तर त्याचे परिणाम त्यांच्या कल्पनांपेक्षा खूप जास्त गंभीर असतील.
संघ : भारत : रिषभ पंत (कर्णधार), के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, बी. साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रे•ाr, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, आकाश दीप.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, देवाल्ड ब्रेविस, टोनी डी जोर्झी, झुबेर हमजा, सायमन हार्मर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, रायन रिकल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल व्हेरेन.
सामन्याची वेळ : सकाळी 9 वा.