तिबेटियनांच्या धार्मिक स्वातंत्र्याबाबत भारताने आवाज उठवावा
तिबेटी पार्लमेंट इन एक्सेल; खा. शेट्टरना निवेदन
बेळगाव : 17 व्या तिबेटी पार्लमेंट इन एक्सेलच्या स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारी (दि.12) नवी दिल्लीत खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. भारताने 60 वर्षांहून अधिक काळ तिबेटियन लोकांना कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारल्याबद्दल भारताचे आभार मानले. आता चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीसीपी) राजवटीत तिबेटवर सांस्कृतिक नरसंहार व तिबेटी ओखळ पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. तिबेटमधील मुलांच्या हक्कांवर व धार्मिक स्वातंत्र्याबाबत भारतीय धोरणकर्त्यांनी आवाज उठवावा, अशी मागणी केली.
यासंबंधी खासदार शेट्टर यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दलाई लामा यांच्या मार्गदर्शनाखाली तिबेटियन अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने जाण्याच्या वचनबध्दतेवर दृढ राहिले असून हे तत्त्व जगभरातील स्वातंत्र्य आणि न्याय शोधणाऱ्य़ांसाठी प्रेरणादायी आहे. तिबेटियनांचे हक्क, आशा-आकांक्षा, शांततापूर्ण वातावरणासाठी भारतीय धोरणकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तिबेटीना स्वयंनिर्णयाचा अधिकार नाकारल्याबद्दल पीआरसीला जबाबदार धरणे, आंतरराष्ट्रीय कायदा उचलून धरण्याचा प्रयत्न चीन करीत आहे. तिबेटबाबत चीनला श़ांत करणे यासाठी प्रयत्न भारताकडून व्हावेत.