तिसऱ्या तिमाहीत 44 दशलक्ष स्मार्टफोन्सची भारतात शिपमेंट
इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनची माहिती : सॅमसंग आघाडीवर
नवी दिल्ली :
2023 च्या तिसऱ्या तिमाहीत 44 दशलक्ष स्मार्टफोनची शिपमेंट भारतात करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन यांच्याकडून या संदर्भातली माहिती देण्यात आली असून यावेळची शिपमेंट ही सपाट स्तरावर राहिली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये तुलनेने स्मार्टफोनचा पुरवठा काहीशा वाढीसोबत करण्यात आला होता. 2019 नंतर पाहता गेल्या सप्टेंबरमध्ये मध्ये करण्यात आलेली शिपमेंट ही सर्वात कमी मानली जात आहे. मागणीमध्ये झालेली घट त्याचप्रमाणे वाढलेल्या किमती हे या मागचे कारण सांगितले जात आहे. शिपमेंटमध्ये जरी नरमाई असली तरी स्मार्टफोन खरेदीमध्ये भारतीयांनी चांगली कामगिरी केली आहे.
या शिपमेंटमध्ये सॅमसंगने आघाडी घेतली आहे. भारतीय बाजारामध्ये सर्वाधिक वाटा उचलणाऱ्या आघाडीवरच्या 10 कंपन्या पाहुया....
कंपनी बाजारातील वाटा
? सॅमसंग 16 टक्के
? रियल मी 15 टक्के
? विवो 13 टक्के
? शाओमी 11 टक्के
? ओप्पो 9टक्के
? वन प्लस 6 टक्के
? अॅपल 5 टक्के
? इनफिनिक्स 3 टक्के
? टेक्नो 2.9 टक्के