भारत आज इंग्लंडवरील आघाडी वाढविण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ चेन्नई
मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीविषयी चिंता असली, तरी भारताचा टी-20 संघ आज शनिवारी होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक असेल. बुधवारी ईडन गार्डन्सवर सात गडी राखून सहज विजय मिळवल्यानंतर भारत 1-0 ने आघाडीवर आहे.

यजमानांना शमीला खेळवायचे असले, तरी सध्याच्या परिस्थितीनुसार अकरा जणांमध्ये त्याचा समावेश हा त्याच्या तंदुऊस्तीच्या पुढील मूल्यांकनावर अवलंबून असेल. हा 34 वर्षीय खेळाडू पहिल्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा होती आणि तो जाळ्यातील सरावात सक्रियपणे सहभागी होता. परंतु त्याचे पुनरागमन पुढे ढकलण्यात आले. कारण व्यवस्थापनाला तो पूर्णपणे सज्ज झाला आहे की नाही याची खातरजमा करायची आहे.
तथापि, कोलकातामध्ये भारताला शमीची फारशी उणीव भासली नाही. तिथे वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने नवीन चेंडूवर आणि फिरकी गोलंदाज वऊण चक्रवर्तीने मधल्या टप्प्यात प्रभावी स्पेल टाकत इंग्लंडला उद्ध्वस्त केले. ईडनच्या खेळपट्टीवर जलद आणि फिरकी गोलंदाजांनाही पुरेशी मदत मिळाली, परंतु चेन्नईतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अधिक मदत करू शकते. भारत खेळपट्टीचे स्वरूप काहीही असो, तक्रार करणार नाही. कारण वऊण, उपकर्णधार अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांचा समावेश असलेल्या या संघात दर्जेदार गोलंदाज आणि विविधता आहे.

इंग्लंडच्या दृष्टिकोनातून भारतीयांना आव्हान देण्यासाठी अनुभवी फिरकी गोलंदाज आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्याकडून त्यांना अधिक चांगल्या योगदानाची आवश्यकता भासेल. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या व्यतिरिक्त इतर कोणताही इंग्लिश गोलंदाज पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माच्या हल्ल्यासमोर आणि संजू सॅमसनच्या फलंदाजीसमोर टिकू शकला नाही. गेल्या वर्षी टी-20 मध्ये एकत्र आल्यापासून सॅमसन आणि अभिषेकला लक्षणीय यश मिळाले आहे, ज्यामुळे भारताला अनेकदा धडाकेबाज सुऊवात मिळालेली आहे. कोलकात्यात अभिषेकने 230 पेक्षा जास्त सरासरीने धावा काढत इंग्लंडला धक्का दिला, तर सॅमसनने गेल्या सहा डावांत तीन शतके झळकावली आहेत.
चेन्नईत देखील या भारतीय सलामीवीरांना खेळपट्टीच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाचा विचार करून संघाला एक मजबूत सुऊवात करून द्यावी लागेल. इंग्लंडलाही त्यांच्या सलामीवीरांकडून डावाला गती मिळण्याच्या दृष्टीने जोरदार सुऊवातीची अपेक्षा असेल, कारण फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी मिळून् सात चेंडूंत फक्त चार धावा केल्या आहेत.

कर्णधार सूर्यकुमार यादवनेही चमक दाखविण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर मागील 11 डावांमध्ये त्याने फक्त दोन अर्धशतके केली आहेत. गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले असून कोलकाता येथे तो खातेही उघडू शकला नाही. परंतु जेव्हा संघ यशस्वी होतो तेव्हा अशा गोष्टी मागे पडतात. असे असले, तरी आज चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा त्याला असेल.
एकच सामना झालेला असल्याने भारतीय संघात अनेक मोठे बदल होणार नाहीत आणि जर शमी पुनरागमन करण्यासाठी खरोखरच तंदुरुस्त असेल, तर नितीशकुमार रेड्डीला वगळून त्याला जागा दिली जाऊ शकते. चेपॉकच्या खेळपट्टीचे वैशिष्ट्या लक्षात घेता इंग्लंड फिरकी गोलंदाजी विभागाला बळकटी देण्याच्या प्रयत्नात तरुण लेगस्पिनर रेहान अहमदचा समावेश करू शकतो.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीशकुमार रे•ाr, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशिद, मार्क वूड.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा., प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1 व डिस्ने हॉटस्टार.