कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक विद्यापीठ स्पर्धेत गैरप्रकार भारताचे सचिव बलजित सिंग निलंबित

06:25 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

जर्मनीतील राईन-रुहर येथे सुरू असलेल्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये निवडलेल्या बॅडमिंटन खेळाडूंना सहभागी न होण्यामागील गैरव्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी भारतीय विद्यापीठ संघटनेने त्यांचे संयुक्त सचिव बलजित सिंग सेखाँ यांना निलंबित केले आहे आणि तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

Advertisement

जर्मनीत 16 जुलै रोजी व्यवस्थापकांच्या बैठकीत भारतीय अधिकऱ्यांनी सर्व खेळाडूंची नावे योग्यरित्या सादर न केल्याने निवडलेल्या 12 खेळाडूंपैकी सहा खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर कांस्यपदक विजेता भारतीय बॅडमिंटन संघ वादात सापडला. तथापि, (विद्यापीठ क्रीडा आंतरराष्ट्रीय संस्था) सोबतच्या वाटाघाटीनंतर सांगितले की, संघातील सर्व 12 सदस्यांना पदके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. रोहन कुमार, दर्शन पुजारी, अदिती भट्ट, अभिनाश मोहंती, विराज कुवळे आणि अलिशा खान हे 12 सदस्यीय संघात होते. पण त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. महिला क्वार्टर-मायलर देवयानी बजाला यांनीही आरोप केला की, अधिकाऱ्यांनी पुष्टीकरण यादी सादर करण्यात उशिरा केल्यामुळे तिचे नाव गायब झाले. म्हणून ती स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही. चौकशी पॅनेल या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि ते निष्पक्षपणे काम करेल याची खात्री करण्यासाठी आम्ही आमचे संयुक्त सचिव बलजित सिंग सेखाँ यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅनल 15 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल, असे एआययूचे सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांनी सांगितले. बिलासपूर येथील गुरु घासीदास विद्यापीठाचे कुलगुरू अनिल कुमार कलकल यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनेल असेल. कलकल आणि बिरेंद्र सिंग हे समितीचे दोन सदस्य आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article