चौथा व शेवटचा टी-20 सामना आज, रिंकू सिंगला फॉर्म गवसण्याची अपेक्षा, संजू सॅमसनचे ‘शून्य’ मालिका खंडित करण्याचे लक्ष्य, यजमानांकडून कडवा प्रतिकार अपेक्षित
वृत्तसंस्था/जोहान्सबर्ग
भारत जोहान्सबर्ग येथे आज शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चौथी टी-20 लढत खेळणार असून यावेळी आणखी एक द्विपक्षीय मालिका जिंकण्याचे लक्ष्य ते बागळून असतील. मात्र रिंकू सिंगच्या फलंदाजीचे स्थान आणि त्याने पत्करलेली सावध शैली संघाला निश्चितच चिंता करायला लावेल. मालिकेत आतापर्यंत संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी नोंदविलेल्या शतकांमुळे भारताने आघाडी घेतली आहे. परंतु संघाला 3-1 ने जिंकण्यासाठी फलंदाजीत अधिक समन्वयाची गरज आहे.
भारताला वांडरर्स तसे जास्त करून अनुकूल ठरले आहे. याच ठिकाणी त्यांनी 2007 च्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. याच स्टेडियमवर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचे अंतिम आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते आणि एक वर्षापूर्वी झालेल्या त्या टी-20 मालिकेतील सामन्यात भारताने विजय मिळवला होता. भारतीय कर्णधाराचे मागील मालिकेतील कामगिरीत सुधारणा करण्याचे लक्ष्य निश्चित राहील. त्या मालिकेत एक सामना पावसामुळे गमवावा लागून मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती. कर्णधार या नात्याने सूर्यकुमारच्या विजयाची सरासरी 81.25 इतकी असून त्याने 16 पैकी 13 सामने जिंकले आहेत.
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कार्यकारी मुख्य प्रशिक्षक व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना माहिती आहे की, रिंकू सिंग हा सर्वोत्तम टी-20 क्रिकेट खेळाडूंपैकी एक आहे. मात्र अलीकडच्या काही महिन्यांत अचानक त्याने फॉर्म गमावला असून त्याची कारणे स्पष्ट नाहीत. मात्र असे दिसते की, अलीगडच्या या खेळाडूचे फलंदाजीचे स्थान आणि सहाव्या व सातव्या क्रमांकावर फ्लोटर म्हणून त्याला वापरणे त्याला फारसे मदतकारी ठरत नाही. रिंकूचे विश्लेषण करण्यासाठी आणि फॉर्म परत मिळविण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी सूर्याकडे भरपूर वेळ आहे. कारण रिंकू हा अनिश्चिततेमुळे गमावण्यासारखा खेळाडू नाही. शिवाय 2026 मध्ये भारतात होणारा पुढचा टी-20 विश्वचषक अजून खूप दूर आहे.
रिंकूने सध्याच्या मालिकेत फक्त 28 धावा केल्या आहेत, दोन सामन्यांत तो सहाव्या आणि एका सामन्यात सातव्या स्थानावर आला. तो कुठे फलंदाजीला येत आहे याचा विचार करून त्याच्या 11, 9 आणि 8 या धावसंख्यांवर जास्त लक्ष केंद्रीत करता कामा नये. तथापि, धावा काढण्यासाठी त्याने किती चेंडू (34) घेतले आहेत त्याचा विचार केला तर ते चिंताजनक बनते. आयपीएलमध्ये ‘केकेआर’तर्फे खेळताना त्याची सरासरी सामन्यामागे 7.5 चेंडू अशी राहिली. रिंकू 15 सामन्यांमध्ये 113 चेंडू खेळला आहे.
रिंकूला एक विशेष फिनिशर म्हणून पाहिले जात असे आणि सामान्यत: एका डावात तो 10 चेंडूंचा सामना करून जोरदार फटकेबाजी करत असे. या योजनेचा भारतीय संघाला फायदा झाला असता. परंतु अलीकडे त्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे. रिंकूने बहुतेक वेळा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. परंतु रिंकूसाठी हार्दिक पांड्याच्या पुढे फलंदाजीस येणे कठीण ठरू शकते. तिलक वर्माने स्वत:ला क्रमांक 3 वर स्थापित केले आहे आणि संजू सॅमसन सलामीवीराच्या भूमिकेत समाधानी आहे. टीम थिंक-टँकने ही समस्या शक्य तितक्या लवकर सोडवणे संघाच्या भल्याचे ठरेल.
पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताने त्यांच्या 15 पैकी 12 खेळाडूंचा वापर केला. दोन वेगवान गोलंदाज वैशाख विजयकुमार किंवा यश दयाल यांना अजून खेळविण्यात आलेले नसून खेळपट्टीवर आणखी वेगवान गोलंदाजाची गरज भासल्यास त्यांना खेळविले जाते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुसरीकडे, लागोपाठ धक्के बसलेला सॅमसन आपण मार्को जेनसेनचे आवडीचे लक्ष्य बनत आहोत हे विसरून पुन्हा चमक दाखविण्याची आशा बाळगून असेल. रमणदीप सिंग हा विविध कौशल्यांसह उपयुक्त खेळाडू ठरू शकतो. त्याच्यात यष्टीरक्षण वगळता इतर सर्व स्थानांवर क्षेत्ररक्षण करण्याची क्षमता आहे.
►भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.
►दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेनसेन, हेन्रिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, आंदिले सिमेलेन, लुथो सिपाम्ला, ट्रिस्टन स्टब्स.