विश्व कसोटी मानांकनात भारत सहाव्या स्थानी
वृत्तसंस्था / दुबई
शुक्रवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप ताज्या गुणतक्त्यात भारतीय संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे तर वेलिंग्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत विंडीजचा 9 गड्यांनी पराभव करणाऱ्या न्यूझीलंडने संयुक्त तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
गेल्या महिन्यात द. आफ्रिका संघाने भारताचा कसोटी मालिकेत 2-0 असा एकतर्फी पराभव केल्यानंतर भारताची विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर घसरण झाली होती तर न्यूझीलंड सहाव्या स्थानावर होता. विश्व कसोटी चॅम्पियनशिप मानांकनात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत 100 टक्के गुण (विजय-पराजय टक्केवारी) मिळविले आहेत तर द. आफ्रिकेने 75 टक्के गुण नोंदवित दुसरे, न्यूझीलंडने तिसरे, लंका चौथे तर पाकने पाचवे स्थान घेतले आहे