For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडिया पोस्ट पेंमेंट्स बॅंकेच्या ग्राहकांना सतर्कतेचा इशारा

04:52 PM Jan 11, 2025 IST | Pooja Marathe
इंडिया पोस्ट पेंमेंट्स बॅंकेच्या ग्राहकांना सतर्कतेचा इशारा
Advertisement

दिल्ली

Advertisement

सध्या ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण वाढले आहे. वरच्यावर अनेक बॅंकांचे ग्राहक अगदी सहजपणे या फसवणुकीचा बळी ठरत आहेत. अशातच इंडिया पोस्ट पेमेंटस् बॅंके (IPPB) चे ग्राहकही अशा फसवणुकीचे बळी पडत आहेत. या बॅंकेच्या ग्राहकांना मोबाईलवर संदेश जातो आहे की, जर येत्या २४ तासात तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतील खात्याला पॅन चा तपशील अपडेट केला नाही तर तुमचे खाते बंद होईल. पॅन अपडेट करण्यासाठी मोबाईलवर लिंक पाठविली जाते.

याप्रकरणी सरकारच्या प्रेम इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB ) च्या तथ्य तपासणी पथकाने हे संदेश बनावट असल्याचे सांगितले आहे. इंडिया पोस्टने कधीही असे संदेश पाठविलेले नाहीत. लोकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. अशा कोणत्याही फोन कॉलवर किंवा लिंगवर आपली वैयक्ति माहिती शेअर करू नये.
फसव्या संदेशांमध्ये अनेकवेळा कायदेशीर संस्थांचा संदर्भ असतो. फोन कॉल आल्यावर घाबरून जाऊ नका. सावधगिरी बाळगा. अशा कॉल मागची सत्यता पडताळा. तुमचे पॅन, आधार, बॅंकेच्या खात्याचा तपशील अशी कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखीसह शेअर करू नका. फसवणुकीतील विविध प्रकार समजून घ्या. आपल्या बॅंक खात्यांवर लक्ष ठेवा, अनधिकृत व्यवहार त्वरीत शोधा असा संदेशही खातेदारांना देण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.