कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-पाक युद्धामुळे बाजारावर काळजीचे ढग

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 412 तर निफ्टी 141 अंकांनी नुकसानीत : गुंतवणूकदारांमध्ये चिंता

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

जागतिक बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला. या दरम्यान पहिलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये अधिकचे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे भारतीय बाजार घसरणीसह बंद झाला आहे. पाकिस्तानने 7 ते 8 मे च्या रात्री भारताच्या उत्तर अणि पश्चिम भागात सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. याला उत्तर देताना भारताने लाहोर एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली आहे. या कारणास्तव गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. यहत एका तासामध्ये बाजारात मोठी विक्री झाल्याने सेन्सेक्स अणि निफ्टी घसरणीत राहिले.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स गुरुवारी मजबूत होत 80,912.34 अंकांनी खुला झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 411.97 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 80,334.81 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर  140.60 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 24,273.80 वर बंद झाला आहे.

निफ्टीत एचसीएल टेक हा सर्वाधिक तेजीत राहिला. तर अॅक्सिस बँक, टायटन, कोटक बँक, कोल इंडिया यांचे समभाग वधारले आहेत. दुसऱ्या बाजूला श्रीराम फायनान्स, इटरनल, अदानी एंटरप्र्राईजेस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा. आणि टाटा कंझ्युमर यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत. जागतिक बाजारांमधील संमिश्र वातावरणामध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह ने आपला व्याजदर स्थिर ठेवला  आहे. यावेळी महागाई अणि बेरोजगारी दोन्ही जोखीम वाढल्या आहेत. या कारणास्तव आर्थिक दृष्टीकोन काहीसा वेगळा झाला असल्याचेही म्हटले आहे.

काय आहे जागतिक स्थिती ?

आशियातील बाजारांमध्ये चीनचा सीएसआय 300 0.16 टक्क्यांनी वरती राहिला. शांघाय 0.01 टक्क्यांनी खाली राहिला. हाँगकाँगचा हँगसेंग 0.45 टक्के आणि जपानचा निक्कोई 0.07 टक्क्यांनी वरती जात ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200 अंकावर तेजीत राहिला. एशियन पेंट्स, भारत फोर्ज, बायोकॉन, ब्रिटानिया, कॅनरा बँक,एस्कॉर्ट्स कुबोटा, आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी, आयआयएफएल फायनान्स, एल अँड टी, एमसीएक्स, टायटन, सुला व्हाइनयार्ड्स, युनियन बँक ऑफ इंडिया, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आदींनी यांच तिमाही अहवाल लवकरच सादर होणार आहेत.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article