महिला विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने
वृत्तसंस्था/ कोलंबो
एकदिवशीय सामन्यांच्या महिला विश्वचषकात आज भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार असून भावनिकदृष्ट्या आणि क्रिकेट कौशल्यावर आधारित लढाईचा विचार करता भारताला जबरदस्त पसंती राहील. कारण दोन्ही शेजाऱ्यांमधील भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर महिला विश्वचषक सामन्यात संतुलन आणि लय शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या विस्कळीत पाकिस्तानविऊद्ध भारताचे पारडे खूप भारी आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यातील पुऊषांच्या आशिया कप सामन्यांच्या तीन रविवारी झालेल्या सामन्यांनंतर महिला संघाने केंद्रस्थानी येण्याची वेळ आली आहे. भारत आणि पाकिस्तान महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्व स्वरूपात 27 वेळा खेळले आहेत. भारत त्यात 24-3 असा आघाडीवर आहे. पाकिस्तानचे तीन विजय फक्त टी-20 क्रिकेटमध्ये मिळविलेले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा 100 टक्के विक्रम असून त्यांनी दोन्ही संघांमधील सर्व 11 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांनी त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुऊवात एकदम विऊद्ध पद्धतीने केली आहे. यजमान भारताने श्रीलंकेचा 59 धावांनी पराभव केला. याउलट, बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आणि त्यांना वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजी या दोन्हींविऊद्ध संघर्ष करावा लागला. सर्व संघ प्रत्येकी एक सामना खेळल्यानंतर भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. महिला संघ त्यांचा नेट रन रेट वाढविण्याची संधी घेऊ पाहेल, जो स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात महत्त्वाचा ठरेल. हरमनप्रीत कौर आणि तिचे सहकारी आत्मविश्वासाने भरलेल्या स्थितीत सामन्यात उतरतील.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाची खोली पूर्ण दिसून आली. संघाची स्थिती 6 बाद 124 अशी होऊनही खालच्या फळीने 47 षटकांत 250 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले. श्रीलंकेविऊद्धच्या अपयशानंतरही भारताची फलंदाजी ही त्यांची सर्वांत मोठी ताकद आहे, परंतु चांगली गोलंदाजी असलेल्या संघांविऊद्ध फलंदाजांनी चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची मुख्य चिंता त्यांची फलंदाजी आहे, जी सलामीच्या सामन्यात वाईटरीत्या घसरली. क्रिकेट वगळता या सामन्यात अतिरिक्त तणाव आहे. 2022 च्या विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी माजी पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारूफच्या मुलीसोबत हलकेफुलके क्षण अनुभवले होते. ते दिवस गेले असून रविवारी, आशिया कपमध्ये पुऊष संघाने घेतलेल्या भूमिकेनुसार भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी पारंपरिक हस्तांदोलन टाळतील अशी अपेक्षा आहे,