भारत - पाकिस्तान ‘ब्लॉकबस्टर’ लढत आज
वृत्तसंस्था/ दुबई
आशिया चषकाच्या आज रविवारी येथे होणाऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा सामना करताना भारतीय संघाचे पारडे निश्चितच भरपूर जड असेल. गेल्या काही महिन्यांत सीमेवरील तणाव वाढलेला असला, तरी या सामन्याची तशी हवा मात्र झालेली नाही. चार महिन्यांनी भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचा विचार करता या सामन्याला महत्त्व आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना, तोही रविवारी होत असताना देखील अशा लढतीची जी नेहमी हवा निर्माण व्हायची त्या हवेचा यावेळी अभाव जाणवत आहे.
शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मासारखे फलंदाज, जसप्रीत बुमराहसारखे वेगवान गोलंदाज, फिरकीपटू कुलदीप यादवसारखे आणि वऊण चक्रवर्तीसारखे कौशल्यवान खेळाडू भारतीय संघात आहेत. नवीन कर्णधार सलमान अली आगा याच्या नेतृत्वाखाली आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ कागदावर अधिक धोकादायक दिसतो. तथापि, टी-20 चे चंचल स्वरूप लक्षात घेता नेहमीच धक्कादायक निकालाची शक्यता असते. परंतु या भारतीय संघाविऊद्ध तशा निकालाची शक्यता कमीच राहते.
पाकिस्तानच्या संघातील सर्वांत प्रतिभावान फलंदाजांपैकी एक सलामीवीर सैम अयुब, मधल्या फळीतील हसन नवाज आणि फिरकी त्रिकूट अबरार अहमद, सुफियान मुकीन आणि मोहम्मद नवाज हे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानवर जास्त अवलंबून राहण्याच्या तत्वज्ञानाला सोडून दिलेल्या नवीन चेहऱ्याच्या संघातून आपले महत्त्व सिद्ध करायला उत्सुक असतील.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. मग झालेली लष्करी कारवाई आणि जनतेच्या संतापाने आशिया चषक स्पर्धेतील या सर्वांत हाय-प्रोफाइल सामन्याची हवा कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हजारो तिकिटे अजूनही उपलब्ध असल्याने आणि शुक्रवारी भारताच्या सरावाला फार कमी चाहते उपस्थित राहिल्याने सामन्याभोवतीचा उत्साह कमी दिसत आहे. सोशल मीडियावर भारताने बहिष्कार टाकण्याच्या केलेल्या आवाहनालाही काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.
परिणामी, रविवारी किती बीसीसीआय अधिकारी उपस्थिती लावतील हे सांगणे कठीण आहे. अन्यथा अशा उल्लेखनीय सामन्यावेळी त्यांची रांग लागलेली असते. भारत सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविऊद्ध सामने खेळण्यास भारतीय संघाला परवानगी दिलेली आहे, परंतु द्विपक्षीय पातळीवर खेळण्यास परवानगी दिलेली नाही. प्रसारमाध्यमे गोष्टींना मसालेदार बनवण्याच्या प्रयत्न करत असली, तरी अपेक्षेनुसार, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी राजकारणाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे पसंत केलेले आहे
फिरकीपटूंची लढाई
सामान्यत: भारत-पाकिस्तान सामना हा भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांमधील संघर्ष असतो. परंतु यावेळी दोन्ही संघांच्या फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल आणि जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी हेच तेवढे खास वेगवान गोलंदाज रविवारी खेळताना दिसतील. खेळपट्टीवर चेंडू लक्षणीय प्रमाणात वळत नसला, तरी दोन्ही बाजूंनी एक उजव्या हाताचा मनगटी फिरकी गोलंदाज आणि एक डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज असल्याने एक आकर्षक लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचा सुफियान मुकीम हा एक चांगला गोलंदाज आहे, पण तो कुलदीप यादवच्या जवळपासही पोहोचत नाही. कुलदीच्या गुगलीला तोंड देणे कठीण असते. अबरार अहमदचे लेग-ब्रेक आणि आनंद साजरा करण्याच्या विचित्र पद्धतीमुळे त्याला पाकिस्तानभर अनेक चाहते मिळाले आहेत. परंतु वऊण चक्रवर्ती, ज्याच्या गोलंदाजीत गूढतेचा घटक आहे, तो पाकिस्तानी फलंदाजांच्या मनावर परिणाम करू शकतो. त्याला हाताळणे विशेषत: सैम अयुब, शाहिबजाद फरहानसारख्या तऊणांना कठीण जाऊ शकते. त्यांना फिरकी गोलंदाजांचे चेंडू ओळखणे कठीण जात आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाज, आयसीसीच्या वास्तविक क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर आहे, परंतु तो अक्षर पटेलला तोड होऊ शकत नाही, जो भारतीय संघातील सर्वांत मौल्यवान पण कमी वलय असलेला खेळाडू आहे.
पाकिस्तानसमोर समस्या भारतीय फलंदाजीची
गोलंदाजीपेक्षाही भारताची फलंदाजी पाकिस्तानला चिंताग्रस्त करेल. गिल, अभिषेक, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे हे त्यांच्या दिवशी कोणत्याही गोलंदाजीच्या चिंधड्या उडवू शकतात. अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला, तर सामना जिंकून देण्याच्या क्षमतेच्या बाबतीत फहीम अशरफची हार्दिकशी तुलना करता येणार नाही. हे असे खेळाडू आहेत जे कोणत्याही वेळी खेळपट्टीला दुय्यम ठरवू शकतात.
जर भारताला पाकिस्तान संघातील कोणत्याही एका विशिष्ट गोलंदाजाची काळजी वाटत असेल, तर तो शाहीन असावा. त्याच्या 2021 मध्ये या मैदानावर गोड आठवणी आहेत. त्याने के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि काही षटकांनंतर विराट कोहली यांना बाद करून त्याच्या देशाला टी-20 विश्वचषक स्पर्धेत गट स्तरावर एक चांगला विजय मिळवून दिला होता. पण गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर शाहीन तेव्हाच्या तुलनेत निम्माही प्रभावी गोलंदाज राहिलेला नाही आणि उशिरा स्विंग आणि टप्पा पडल्यानंतर वळणारा त्याचा चेंडू गायब झाला आहे.
भारतासाठी आदर्श फलंदाजी रचना ठरविणे ही गुऊकिल्ली असेल. संजू सॅमसनची जागा महत्त्वाची असेल आणि दुबेचीही जागा महत्त्वाची असेल, ज्यांचे काम मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना निष्प्रभ ठरविण्याचे असेल. हवा नसली, तरी या लढतीविषयी उत्सुकता आहेच. कारण जेव्हा भारत आणि पाकिस्तान मैदानात उतरतात, तेव्हा हवा निर्माण झालेली असो वा नसो, जग ती लढत पाहण्यासाठी थांबतेच.
संघ भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग.
पाकिस्तान-सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, हसन नवाज, खुशदिल शाह, सैम अयुब, हुसेन तलत, फहीम अशरफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद हरीस, साहिबजादा फरहान, अबरार अहमद, हरिस रौफ, हसन अली हसन अली, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम ज्युनियर.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.