कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुदिरमन चषक स्पर्धेतून भारत बाहेर

06:35 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या लढतीत इंडोनेशियाकडून पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ झायमेन, चीन

Advertisement

पीव्ही सिंधू व एचएस प्रणॉय पुन्हा एकदा अपयशी ठरल्याने येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ सुदिरमन चषक फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघ इंडेनेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

गट ड मधील सामन्यात इंडोनेशियाने भारतावर 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. त्याआधी पहिल्या लढतीत रविवारी भारताला डेन्मार्कने 4-1 असे हरविले होते. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी भारताला दुसरी लढत जिंकणे आवश्यक होते. पण आव्हान संपुष्टात आल्याने इंग्लंडविरुद्ध होणारी गटातील शेवटची साखळी लढत बिनमहत्त्वाची ठरली आहे. इंग्लंडचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. इंडोनेशियाने रविवारी इंग्लंडवर 5-0 अशी एकतर्फी मात केली होती तर डेन्मार्कने मंगळवारी इंग्लंडला 5-0 याच फरकाने हरविले.

गटातील पहिले दोनच संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार असल्याने भारताला इंडोनेशियावर विजय मिळविणे गरजेचे होते. एकेरीचे स्टार खेळाडू सिंधू व प्रणॉय फॉर्मसाठी झगडत असल्याने भारताला त्याचा फटका बसला. या दोघांना डेन्मार्कविरुद्धही एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

मंगळवारच्या लढतीत भारताने विजयी सुरुवात केली. मिश्र दुहेरीची जोडी ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांनी अटीतटीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या रेहान नौफल कुशारजांतो व ग्लोरिया इमॅन्युएल विडाला यांच्यावर 10-21, 21-18, 21-19 अशी मात केली. एक तास दहा मिनिटे ही लढत रंगली होती. महिला एकेरीत सिंधूला पुत्री कुसुमा वरदानीने 21-12, 21-13 असे केवळ 38 मिनिटांत हरविले. सिंधूने यापूर्वी वरदानीला दोनदा हरविले होते.

1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पुरुष एकेरीच्या सामन्यात प्रणॉयने जोनातन ख्रिस्तीविरुद्ध पहिला गेम 21-19 असा जिंकून आघाडी घेतली होती. यानंतर मात्र जागतिक सहाव्या मानांकित ख्रिस्तीने नियंत्रण मिळविले आणि पुढील दोन गेम्स 21-14, 21-12 असे जिंकत प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आणले. महिला दुहेरीत प्रिया कोन्जेंगबम व श्रुती मिश्रा यांना लॅनी त्रिया मायासरी आणि सिती फादिया सिल्वा रामाधन्ती यांच्याकडून 10-21, 9-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article