इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन आजपासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विश्वातील आघाडीचे खेळाडू उतरणार असलेल्या आणि आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या इंडिया ओपन सुपर 750 मध्ये यजमान देशाचे आतापर्यंतचे सर्वांत जास्त खेळाडू झळकणार असून भारतीय आव्हानाचे नेतृत्व सातत्यपूर्ण सात्विकसाईराज रनकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांच्याकडे असेल.
या जागतिक क्रमवारीत अव्वल राहिलेल्या आणि 2022 च्या इंडियन ओपनचे विजेते असलेल्या जोडीने 2025 च्या हंगामाला चांगली सुऊवात केली आहे. गेल्या आठवड्यात मलेशिया सुपर 1000 मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पॅरिस ऑलिंपिकमध्ये निराशा केलेली असली, तरी गेल्या दोन वर्षांत ही जोडी भारताची सर्वांत विश्वासार्ह कामगिरी करणारी जोडी म्हणून उदयास आली आहे.
9 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सची इनामे या स्पर्धेत सात्विक आणि चिराग हे त्यांच्या पहिल्या फेरीत मलेशियाच्या वेई चोंग मॅन आणि काई वुन टी यांचा सामना करतील. या जोडीला चीनचे ऑलिंपिक रौप्यपदक विजेते लियांग वेकेंग आणि वांग चांग, पॅरिसमधील कांस्यपदक विजेते मलेशियाचे आरोन चिया आणि सोह वूई यिक, डेन्मार्कचे किम अॅस्ट्रप आणि अँडर्स रासमुसेन आणि इंडोनेशियाचे फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियान्टो यासारख्या आघाडीच्या खेळाडूंच्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
या वर्षीच्या स्पर्धेत 21 भारतीय खेळाडू सहभागी झालेले असून ज्यामध्ये दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा समावेश आहे. विवाहामुळे क्वालालंपूरमध्ये हंगामाच्या पहिल्या स्पर्धेत ती खेळू शकली नव्हती. सिंधू मोहिमेची सुऊवात अनुपमा उपाध्यायविऊद्ध करेल आणि तिचा सामना पुढे गेल्या वर्षीची स्विस ओपनमधील विजेती जपानची उदयोन्मुख स्टार तोमोका मियाझाकीशी होण्याची शक्यता आहे.
लक्ष्य सेन मलेशियामध्ये लवकर बाहेर पडल्यानंतर येथे पुनरागमन करण्याची आशा करेल. परंतु त्याला चिनी डावखुरा खेळाडू हाँग यांग वेंगविऊद्ध सलामीलाच कठीण परीक्षा द्यावी लागेल. एच. एस प्रणॉय पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या ली यांग सुशी लढणार असून त्यात विजयी झाल्यास त्याची गाठ दुसऱ्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीशी पडू शकते. ऑलिंपिक विजेते व्हिक्टर अॅक्सेलसेन आणि अन से यंग तसेच जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाची खेळाडू शी युकी यासारखे आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत उतरलेले असल्याने इंदिरा गांधी स्टेडियममधील के. डी. जाधव इनडोअर हॉलमध्ये जबरदस्त खेळ पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेत जगातील आघाडीच्या 20 पुऊष एकेरी खेळाडूंपैकी 18 आणि 20 महिला एकेरी खेळाडूंपैकी 14 खेळाडू सहभागी झाल्या आहेत.