For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

covid-19; आता नाकाद्वारे घ्या, करोना प्रतिबंधात्मक डोस

01:56 PM Dec 23, 2022 IST | Abhijeet Khandekar
covid 19  आता नाकाद्वारे घ्या  करोना प्रतिबंधात्मक डोस

covid-19;करोनाचे संकट अजूनही संपत नसताना त्याला नष्ट करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ मेहनत घेत आहेत. भारतात करोना प्रतिबंधात्मक लसीचा बुष्टर डोस अद्याप काहींनी घेतला नाही. मात्र त्यांना आता नाकाद्वारे कोव्हिडचा डोस घेता येणे शक्य झाले आहे. कारण जगातील पहिल्या नाकावाटे घेण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीला (नेझल करोना व्हॅक्सिन) अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. करोनाच्या लढ्यात मोठे अस्त्र ठरणाऱ्या लशीबाबतही केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

चीनमध्ये ओमायक्रॉनच्या बीएफ.७ व्हेरियंटने धुमाकुळ घातला असताना भारतातही खबरदारीची पावलं उचलत आहे. त्या पार्श्वभूमीवर करोना संदर्भातील आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने पौढांसाठी नकावाटे देणाऱ्या करोना लसीला मंजुरी देत बुस्टर डोस म्हणून नेझल करोना लशीची शिफारस केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी अधिवेशनात नेझल व्हॅक्सिन आता १८ वर्षावरील नागरिकांना वापरता येईल, असं म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत थेट नाकावाटे करोना लस देण्यात येईल. मात्र, सुरुवातीला ही लस फक्त खासगी रुग्णालयातच मिळणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.