भारत-न्यूझीलंड महिला संघात वनडे मालिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दुबईमध्ये सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाले. आता भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
भारत-न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची ही वनडे मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. या मालिकेतील सामने 24, 27, 29 ऑक्टोबरला होतील. या दोन संघामध्ये अलिकडेच म्हणजे दुबईतील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गाठ पडली होती आणि न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.
2022-25 या कालावधीतील आयसीसीच्या महिलांच्या वनडे चॅम्पियनशीप अंतर्गत ही मालिका राहिल. या मालिकेच्या गुणतक्त्यात न्यूझीलंडचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड महिला संघाने आतापर्यंत 18 वनडे सामन्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. 2025 ची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाला या स्पर्धेसाठी थेड प्रवेश मिळाला आहे. भारतीय संघातील उपकर्णधार स्मृती मानधना, जेमीमा रॉड्रिग्ज, यास्तीका भाटीया, अष्टपैलु दिप्ती शर्मा, डी. एम. लता आणि शिखा पांडे यांचा 8 संघाचा सहभाग असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या वनडे चॅम्पियनशीप स्पर्धेत समावेश राहिल. तर न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिव्हाईन, सलामीची फलंदाज सुझी बेटस् आणि फिरकी गोलंदाज तसेच अष्टपैलु अॅमेलिया केर भाग घेणार आहेत.