For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-न्युझीलंडदरम्यान मुक्त व्यापार करारासाठी चर्चा

06:59 AM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत न्युझीलंडदरम्यान मुक्त व्यापार करारासाठी चर्चा
Advertisement

पंतप्रधान लक्सन यांच्या भारत दौऱ्यावेळी घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि न्युझीलंडने रविवारी मुक्त व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारत आणि न्युझीलंडने एप्रिल 2010 मध्ये  समग्र आर्थिक सहकार्य करारावर चर्चा सुरू केली होती, याचा उद्देश वस्तू, सेवांचा व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे होता, परंतु 2015 मध्ये काही कारणास्तव ही चर्चा 9 फेऱ्यानंतर थांबली होती. परंतु आता ही चर्चा पुन्हा सुरू केली जाणार आहे.

Advertisement

दोन्ही देश मुक्त व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू करण्याची घोषण करत आहेत. या कराराचा उद्देश पुरवठा साखळी मजबूत करणे आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणे सुलभ करणे असल्याचे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने वक्तव्य जारी करत म्हटले आहे.

न्युझीलंडचे पंतप्रधान दौऱ्यावर

न्युझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सर हे भारताच्या चार दिवसीय दौऱ्यावर (16-20 मार्च) आले आहेत. केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. लक्सर हे रायसीना डायलॉग 2025 मध्ये मुख्य अतिथी अणि मुक्त वक्ता म्हणून सामील होणार आहेत. लक्सर यांचा पंतप्रधान म्हणून हा पहिलाच भारत दौरा आहे.

व्यापार मंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय

मुक्त व्यापार करारासाठी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय भारताचे वाणिज्य अन् उद्योग मंत्री पियूष गोयल आणि न्युझीलंडचे व्यापार-गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे. भारत आणि न्युझीलंडदरम्यान दीर्घकालीन भागीदारी असून ती लोकशाहीवादी मूल्ये, लोकांदरम्यान मजबूत संबंध आणि आर्थिक पूरकतांवर आधारित आहे. दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणुकीला सामील करत स्वत:च्या द्विपक्षीय संबंधांना वृद्धींगत करण्याच्या दिशेने सातत्याने काम केले असल्याचे वाणिज्य अन् उद्योग मंत्रालयाकडून जारी निवेदनात म्हटले गेले आहे.

मुक्त व्यापार करारामुळे लाभ

हा करार झाल्यास व्यापार वाढणार असून दोन्ही देशांदरम्यान आर्थिक संबंध मजबूत होणार आहेत. गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होतील आणि बाजारपेठेत कंपन्यांना अधिक हिस्सेदारी मिळू शकणार आहे. पुरवठा साखळी मजबूत झाल्याने व्यापार करणे सोपे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.