भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी आजपासून
ब्रिगेडच्या कामगिरीवर लक्ष, किवीजसमोर यजमानांचे कठीण आव्हान, मात्र सामन्यावर पावसाचे सावट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारत व न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका आज बुधवारपासून सुरू होणार असून भारताच्या संक्रमणाच्या टप्प्याचे नेतृत्व करणारे यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना अस्थिर न्यूझीलंडवर प्रभुत्व मिळविण्याच्या प्रयत्नात संघाची प्रेरक शक्ती बनावे लागेल. जरी अजून पूर्णपणे स्थित्यंतर झालेले नसले, तरी विराट कोहली आणि रोहित शर्मा हे नक्कीच शेवटच्या टप्प्यात आहेत. या दिग्गज खेळाडूंचा वारसा आपण पुढे नेऊ शकतो हे या दोन युवा सुपरस्टार्सना दाखवावे लागेल.
या वर्षाच्या सुऊवातीला झालेली इंग्लंडविऊद्धची मालिका फलदायी ठरलेला गिल आता कसोटी क्रिकेटच्या तीव्रतेशी अधिक परिचित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिलची मान धरलेली आहे. मात्र येथे खेळण्याच्या दृष्टीने तो पूर्णपणे तंदुऊस्त होईल याची खात्री करण्यासाठी संघाचे फिजिओ कठोर परिश्रम घेत आहेत. या सामन्यावर पावसाचा धोकाही लटकत आहे. गिलच्या मागील 10 डावांमध्ये तीन शतके आणि दोन अर्धशतके आहेत, तर जैस्वालच्या कसोटी क्रिकेटमधील मागील आठ डावांमध्ये 214 धावांची खेळी आणि पाच अर्धशतके आहेत.
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा खडतर दौरा होणार आहे. या मालिकेद्वारे त्याची तयारी करणे महत्त्वाचे आहे. गिलने वेगवान गोलंदाजांच्या आत येणाऱ्या चेंडूंचा सामना करताना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण केले आहे असे दिसत त्हे. मात्र अजूनही काही त्रुटी बाकी आहेत. चेन्नईमध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमुदने अखेरीस त्याचा बळी घेण्यापूर्वी अशा चेंडूंवर त्याला बराच त्रास दिला.
त्याचप्रमाणे जैस्वालला वेगवान गोलंदाजांविऊद्ध धाडसी फटके खेळून बाद होण्याची सवय आहे. याचा दाखला अलीकडेच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मिळालेला असून त्यांच्या वेगवान गोलंदाजांविऊद्ध तीन वेळा तो बाद झाला. हा डावखुरा फलंदाजांत 20 डावांमध्ये 12 वेळा वेगवान गोलंदाजांचा बळी ठरलेला आहे आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यापूर्वी आपली कामगिरी सुधारण्याची त्याची निश्चितच इच्छा असेल.
न्यूझीलंडच्या माऱ्यातही वेगवान गोलंदाज मॅट हेन्री, विल्यम ओ’ऊर्के आणि फॉर्ममध्ये तीव्र घसरण झाल्यानंतरही येथे खेळू शकला, तर अनुभवी टीम साऊदी यांचा समावेश असेल. जैस्वाल आणि गिल भारतीय संघाचे आधारस्तंभ म्हणून उदयास येण्यामागे आणखी एक पैलू आहे. कोहली आणि रोहित यांनी हवा तसा धडाका दाखविलेला नाही. यावर्षी 15 डाव खेळलेल्या रोहितने दोन शतके केली आहेत, परंतु उर्वरित 13 डावांमध्ये केवळ 1 अर्धशतकच त्याला करता आले आहे. आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याने केवळ 35 हून अधिक सरासरीने एकूण 497 धावा केल्या आहेत.
9000 कसोटी धावा पूर्ण करण्यास 53 धावांची गरज असलेल्या कोहलीने या वर्षी सहा डावांत एकही अर्धशतक केलेले नाही. 35 वर्षीय कोहली यावर्षी केलेल्या दोन चांगल्या सुऊवातीचे रूपांतर मोठ्या डावात करू शकला नाही. श्रीलंकेविरुद्ध त्याचा डाव 46, तर बांगलादेशविरुद्ध 47 धावांवर आटोपला. त्याला न्यूझीलंडचे डावखुरे फिरकीपटू एजाज पटेल आणि रचिन रवींद्र यांनाही काळजीपूर्वक हाताळावे लागेल. या दोन दिग्गजांनी संपूर्ण मालिकेत आपली छाप उमटविल्याचे पाहायला मिळल्यास काही काळ लोटला आहे आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
भारताला फक्त किरकोळ चिंता आहेत, परंतु फलंदाजी आणि गोलंदाजी या विभागांमध्ये न्यूझीलंडच्या समस्या अधिक मोठ्या आहेत. अलीकडेच त्यांच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या फिरकीपटूंविऊद्ध दूरस्थ मालिका 0-2 ने गमावली आणि येथे त्यांना रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन दिग्गज फिरकीपटूंचा सामना करावा लागेल. त्यांनी बांगलादेशविऊद्ध एकत्रितपणे 20 बळी घेतलेले आहेत आणि चिन्नास्वामी स्टेडियमवरील खेळपट्टीवर फिरकीपटूंना काही प्रमाणात मदत होईल अशी अपेक्षा असल्याने हे अनुभवी खेळाडूंना येथे गोलंदाजी करण्यास उत्सुक असतील. या दोघांशिवाय, किवीजना जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागेल.
मागील मालिकेतील रचना कायम राहिल्यास आकाश दीप हा बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यानंतरचा तिसरा वेगवान गोलंदाज असेल. केन विल्यमसनला दुखापतीमुळे आधीच गमावलेल्या न्यूझीलंडला आणखी एक झटका बसलेला असून त्यांचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे जेकब डफीला संघात आणले आहे.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल, एजाज पटेल, मॅट हेन्री, टिम साउदी, विल्यम ओ’रुर्के, जेकब डफी.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स 18, जिओ सिनेमा