भारत-नेपाळ आज अंतिम लढत
वृत्तसंस्था/ कोलंबो
कोलंबोमध्ये सुरु असलेल्या अंध महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 गंड्यानी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. त्याचप्रमाने पकिस्तानवर 7 गंड्यानी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली.रविवारी भारत आणि नेपाळ यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियने 20 षटकात 9 बाद 109 केल्या ऑस्टेलिया संघातील बुखाओने 34 धावा केल्या भारतीय संघातील सिमरनजीत कौरने 6 धावात 1 गडी बाद केला ऑस्ट्रेलियाचे 6 फंलदाज धावचीत झाले त्यानंतर भारताने 11.5 षटकात 1 बाद 112 धावा जमवित विजय नोंदविला. बसंती हंसदाने 45, गंगा कदमने 41 तर के. करुणा 16 धावा केल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फंलदाजी करताना पाकने 20 षटकात 6 बाद 169 धावा जमविल्या त्यांनतर नेपाळच्या डावामध्ये पहिले दोन फंलदाज लवकर बाद झाले त्यानंतर नेपाळ संघातील विनीता पूनने 23 चेंडूत 46 सुष्मा तमांगने नाबाद 36 धाव केल्या पाकच्या शुमैला किरणने अणि मेहरीन अलीने प्रत्येकी 1 गडी बाद केला.