कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टी-20, वनडेत भारत, कसोटीत ऑस्ट्रेलिया अग्रस्थानी

06:42 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीसी वार्षिक मानांकन यादी जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

आयसीसीने जाहीर केलेल्या वार्षिक ताज्या क्रमवारीत भारताने वनडे व टी-20 मधील अग्रस्थान कायम राखले, पण कसोटी मानांकनात चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने कसोटीमधील अग्रस्थान मिळविले आहे.

मे 2024 पासून खेळविण्यात आलेल्या सामन्यांना शंभर टक्के वेटेज देण्यात आले आहे तर त्याआधीच्या दोन वर्षातील सामन्यांना 50 टक्के वेटेज देण्यात आले आहे. वनडे मानांकनात 2023 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठलेल्या भारताने आपले अग्रस्थान आणखी भक्कम केले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा त्यांना लाभ झाला आहे. या यशामुळे भारताचे रेटिंग गुण 122 वरून 124 झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपविजेतेपद मिळविलेल्या न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत दुसरे स्थान घेतले आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

लंकेने अलीकडे मायदेशात देशात झालेल्या मालिकांत चांगली कामगिरी केल्याने त्यांना चौथ्या स्थानावर मजल मारता आली. भारत व ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी मालिकाविजय मिळविण्याचा पराक्रम केला. याचे त्यांना पाच रेटिंग गुण मिळाल्याने पाकिस्तान (एक गुण मिळवित पाचवे स्थान) व द.आफ्रिका (4 गुण गमवित सहावे स्थान) यांना त्यांनी मागे टाकले. चार गुणांची कमाई करीत अफगाण संघानेही प्रगती करीत सातवे स्थान घेतले आहे. चार गुण गमविल्याने माजी वर्ल्ड चॅम्पियन्स इंग्लंडला मात्र आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. विंडीजने पाच गुणांची कमाई करीत नववे स्थान मिळवित बांगलादेशला मागे टाकले. चार गुण गमविल्याने बांगलादेशला दहावे स्थान मिळाले आहे.

कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

विद्यमान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने कसोटी संघांच्या मानांकनात अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र त्यांची आघाडी 15 वरून 13 गुणांवर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे 126 रेटिंग गुण झाले आहेत. बेन स्टोक्सच्या इंग्लंड संघाने मोठी झेप घेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. त्यांनी द.आफ्रिका व भारताला मागे टाकले. गेल्या वर्षी इंग्लंडने चारपैकी 3 कसोटी मालिका जिंकल्या. याचा त्यांना फायदा झाला. त्यांचे 113 रेटिंग गुण झालेत तर द.आफ्रिकेचे 111, भारताचे 105 रेटिंग गुण झाले आहेत. उर्वरित संघांच्या मानांकनात कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंड पाचव्या, लंका सहाव्या, पाक सातव्या, विंडीज आठव्या, बांगलादेश नवव्या व झिम्बाब्वे दहाव्या स्थानावर आहेत. कसोटीमध्ये दहा संघांनाच मानांकनात ठेवण्यात आले आहे. आयर्लंडला पुढील 12 महिन्यात आणखी एक कसोटी खेळावी लागेल. त्यानंतर ते मानांकनास पात्र ठरणार आहेत तर अफगाणला आणखी तीन कसोटी खेळाव्या लागणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article