भारत आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्वचषकाची मोहीम निराशाजनकरित्या संपली. मनिका बत्रा आणि कंपनी चेंगडू, चीन येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करुन गट टप्प्यात बाहेर पडली.
गट 2 मध्ये बरोबरीत असलेल्या भारताला त्यांच्या मोहिमेला शेवट निराशेने झाला. जपान, ऑस्ट्रेलिया आणि क्रोएशियाकडून सर्व तीन गट सामने गमावून पहिल्या टप्प्यात स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सर्व आवृत्त्यांमध्ये गट टप्प्याच्या पुढे जाण्यात अपयशी ठरल्याने, स्पर्धेतून भारताचा सलग तिसऱ्यांदा लवकर बाहेर पडण्याचा हा प्रकार आहे. त्यांच्या मोहीमेच्या पहिल्या सामन्यात भारतीय टेबल टेनिस खेळाडूंना क्रोएशियाने 8-6 असे हरविले. ऑलिम्पिकपटू साथियान ज्ञानशेखरन आणि दिया चितळे यांचा मिश्ा़dर दुहेरीच्या पहिल्या सामन्यात इव्होन बान आणि हाना अरापोविच यांच्याविरुद्ध 2-1 असा पराभव झाला तर महिला एकेरीत मनिका बत्राचा ली राकोवाककडून 2-1 असा पराभव झाला. भारताच्या मानव ठक्करने धाडसी प्रयत्न केले पण पुरूष एकेरीत त्याला क्रोएशियाच्या टोमिस्लाव पुकारकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांनी महिला दुहेरीत 3-0 असा विजय मिळवला आणि भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. साथियान ज्ञानशेखरन आणि आकाश पाल यांनी सुरूवातीला पुरूष दुहेरीचा पहिला गेम जिंकून वरचढ कामगिरी केली. परंतु क्रोएशियाने दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली.
स्पर्धेच्या नियमांनुसार, प्रत्येक सामना तीन गेमपर्यंत मर्यादित असतो. परंतु एकूण सामना त्या संघाकडे जातो जो आधी आठ गेम जिंकतो. जपानविरुद्ध भारताच्या दुसऱ्या गट सामन्यात काही अपसेट असूनही त्यांना 8-4 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत यशस्विनी घोरपडे आणि आकाश पाल जोडीने शुन्सुके तोगामी आणि मिवा हयाता यांच्याविरुद्ध पहिला सामना 3-0 असा गमावल्यानंतर, ऑलिम्पियन मनिका बत्राने एका सामन्यात पिछाडीवर पडल्यानतंरही पुनरागमन केले आणि जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या मीमा इटोचा 2-1 (9-11, 11-8, 11-8) पराभव केला. बत्राने एकेरीच्या सामन्यात जपानच्या मीमा इटोचा, जी जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे, पराभव केला. त्यानंतर मानव ठक्करने जपानच्या सोरा मत्सुशिमावर 2-1 असा रोमांचक विजय मिळविला, जो जगात आठव्या स्थानावर आहे. त्याने 11-9, 11-4, 6-11 असा विजय मिळवला. तथापि, दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे यांचा मिमा इटो आणि हिना हयाता यांच्याकडून 3-0 असा पराभव झाल्याने भारताला स्पर्धेत सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.
मंगळवारी झालेल्या आयटीटीएफ मिश्र सांघिक विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यातील भारताच्या अंतिम सामन्यात ऑस्टेलियाने 8-5 असा विजय मिळविला. मानव ठक्कर आणि स्वस्तिका घोष यांनी कॉन्स्टँटिन सिसहोगिओस आणि हुवान बे यांच्याविरुद्ध सलामीचा सामना 2-1 असा जिंकला. परंतु यशस्विनी घोरपडे आणि साथियान ज्ञानशेखरन यांना अनुक्रमे महिला आणि पुरूष एकेरीत 2-1 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली. महिला दुहेरीत बत्रा आणि चितळे यांचा 2-1 असा पराभव झाला. त्यानंतर पायस जैन आणि आकाश पाल यांनी पुरूष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करला. त्यामुळे बरोबरी संपली आणि भारताच्या मोहीमेवर पडदा पडला.