5 जी स्मार्टफोन बाजारात भारत जगात दुसरा
अमेरिकेला टाकले मागे : चीन अव्वल स्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये 5जी स्मार्टफोनची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारत असून काउंटर रिसर्च यांच्या एका अहवालामध्ये 5जी स्मार्टफोनच्या बाबतीत भारत आता दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा देश बनला आहे.
पहिल्या नंबरवर चीन हा देश आहे. जागतिक 5 जी स्मार्टफोन बाजारामध्ये पाहता पहिल्या नंबरवर असणाऱ्या चीनची हिस्सेदारी 32 टक्के इतकी असून भारताची 13 टक्के इतकी आहे. सॅमसंग, विवो आणि शाओमी या बजेटअंतर्गत स्मार्टफोनच्या सादरीकरणामुळे बाजारपेठेतली शेजारी वाढवण्यामध्ये भारताला यश मिळाले आहे. निम्म्या वर्षामध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकत 5जी स्मार्टफोन बाजारात दुसऱ्या नंबरवर हिस्सेदारी मिळवण्यात बाजी मारली आहे.
अमेरिकेची हिस्सेदारी 5जी स्मार्टफोन बाजारात कमी होऊन 10 टक्क्यांवर आली आहे. जगभरामध्ये 5जी स्मार्टफोनचा विस्तार पाहता अॅपलची हिस्सेदारी सर्वाधिक असून ती 25 टक्के आहे. यामध्ये आयफोन 15 आणि आयफोन 14 सिरीज अंतर्गत स्मार्टफोनचे योगदान सर्वाधिक मानले जात आहे. 21 टक्के हिस्सेदारीसह सॅमसंग दुसऱ्या स्थानावर असून गॅलेक्सी ए आणि एस 24 सिरीज अंतर्गतचे स्मार्टफोन त्यांची हिस्सेदारी वाढवण्यात हातभार लावणारे ठरले आहेत.
शाओमी कंपनीचा विकास मोठ्या प्रमाणात होत असून जागतिक स्तरावरती कंपनी तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. भारतामध्ये शाओमीने तीन अंकांमध्ये विकास साधला आहे. त्याचप्रमाणे मध्य पूर्वेकडील देश, आफ्रिका, युरोप आणि चीनमध्येही शाओमीने स्मार्टफोन बाजारामध्ये हिस्सेदारी वाढवण्यात यश मिळवले आहे. याप्रमाणे विवो ही कंपनी देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकासात आघाडी घेताना दिसते आहे.